आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात आचारसंहितेपूर्वी 200 कोटींची कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होणार असून त्याआधी जिल्हाभरात जिल्हा नियोजन मंडळामार्फत सुमारे 200 कोटी रुपयांची कामे हाती घेतली जाणार आहेत.
यातील बहुतांश कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यांची कामे, शाळाखोली बांधकाम, समाजमंदिर बांधकाम, साखळी नाल्यांची बांधणी अशी कामे या निधीतून केली जात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होऊ शकली नव्हती.

लोकसभेची आचारसंहिता संपताच झालेल्या बैठकीत 200 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच पुढील प्रक्रिया हाती घेण्यात आली असून येत्या काही दिवसांत या कामांचा प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.

राजकीय फायदा
नियोजन मंडळाच्या निधीतील ही कामे लवकर सुरू झाली तर त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो, असे काँग्रेसजनांचे म्हणणे आहे. त्यामुळे निवडणुकीत या कामांची जाहिरातही होऊ शकते. 9 तालुक्यांत मिळून अवघ्या 200 कोटींची सुरू असलेली कामे दिसणेही अवघड आहे, तरीही त्याचा फायदा होईल, असे सत्ताधा-यांना वाटते. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर सुरू व्हावीत यासाठी पालकमंत्री बाळासाहेब थोरात स्वत: प्रयत्नशील होते. पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत नियोजन मंडळाचा निधी खर्च करणे अपेक्षित असले तरी तो अलीकडेच खर्च करण्यास शासनाने मान्यता दिल्यामुळेच. काही कामे 8 दिवसांत सुरू होण्याची शक्यता जिल्हाधिका-यांनी वर्तवली आहे.