आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तववादी पुस्तकांना मिळतेय वाचकांची पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मोसम कोणताही असो, वाचकांसाठी नवीन पुस्तक म्हणजे पर्वणी असते. शहरात सध्या विविध ठिकाणी पुस्तक प्रदर्शने सुरू आहेत. त्यात वास्तववादी पुस्तकांना वाचकांची पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. मागील महिन्यात पत्रकार लेखकांची तीन नवीन पुस्तके बाजारात आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील दोन पुस्तके सध्या गाजतायेत, तर क्रीडा प्रकारात युवराज सिंहची ‘बायोग्राफी’ नंतर आता सचिन तेंडुलकरवर आलेले ‘क्रिकेटर ऑफ द सेंच्युरी’ हे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे, तर डॅन ब्राउनचे ‘इनफेर्नो’ या पुस्तकाबद्दलही इंग्रजी वाचकप्रेमींमध्ये उत्सुकता दिसून येते आहे.

मोदी यांच्यावर मुखोपाध्याय यांनी लिहिलेले ‘द मॅन, द टाइम्स’, किंगशुक नाग यांचे ‘द नमो स्टोरी : अ पॉलिटिकल लाइफ’ हे पुस्तक एप्रिलमध्ये प्रकाशित झाले. विद्या बुक्सचे शशिकांत पिंपळापुरे यांनी सांगितले की, वाचकांमध्ये सध्या चालू घडामोडींवरील वाचन वाढले आहे. त्यातही वास्तववादी पुस्तके ही त्यांच्या आवडीची ठरत आहेत. मोंदींवर नुकतेच आलेल्या पुस्तकाला वाचकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. क्वॉडरँगलचे पुस्तक विक्रेते सांगतात की, ‘अँड द माउंटेन्स इकोड’ या पुस्तकाची प्रसिद्धीपूर्व बुकिंग सुरू झाली आहे.