आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 तासांत कोसळला वर्षभरातील सर्वात जास्त पाऊस, शहरात 78 मिमीची नाेंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे गारखेड्यातील हनुमाननगर येथे रस्त्यावर असे पाणी साचले. (संबंधित. डीबी स्टार) छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
रविवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे गारखेड्यातील हनुमाननगर येथे रस्त्यावर असे पाणी साचले. (संबंधित. डीबी स्टार) छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद- यंदाच्या पावसाळ्यातील पहिला मोठा पाऊस १९ आणि २० आॅगस्ट रोजी झाला. रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३६.२ मिमी तर दोन दिवसांतील २८ तासात मिळून ७८ मिमी पाऊस झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यात सरासरी ३५ मिमी पाऊस झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पाऊस गायब होता. शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून जिल्हाभरात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. विशेषत: कापूस, तूर पिकाला फायदा होणार आहे. चिकलठाणा वेधशाळेचे शास्त्रज्ञ सुनील काळभोर यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ४१.४ मिमी पाऊस झाला. रविवारी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेपाच वाजेपर्यंत ३६.२ मिमी पाऊस झाला. २४ तासांत ७८ मिमी पाऊस झाला आहे. यंदा जूनला १२.१ मिमी, जूनला ९.५, जूनला १०.८ आणि १५ जूनला ३४ तर जुलै रोजी १४.७, १० जुलैला १९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. 

सिल्लोडतालुक्यात सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ६१ मिमी पाऊस झाला आहे. ढोरकीन ६५, अजिंठा ७६, आमठाणा १०५ आणि भेंडाळ्यात ८५ मिमी पाऊस झाला आहे. 

२० ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजेपर्यंत उस्मानपुरा ३४, भावसिंगपुरा २६, चित्तेपिंपळगाव ३७, चौका ४०, लाडसावंगी २५, करमाड ३९, कांचनवाडी २७, चिकलठाणा ३३ आणि औरंगाबाद २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 
 
औरंगाबाद तालुक्यात ३२ मिमी पाऊस 
औरंगाबाद तालुक्यात ३२ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील १० मंडळांमध्ये वरुड काझीत सर्वाधिक ४१ मिमी पाऊसाची नोंद आहे. 
बातम्या आणखी आहेत...