आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने किडनी देऊन मुलाला दिला पुनर्जन्म, सर्व स्तरांतून होतेय कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दोन्ही किडन्या निकामी झालेल्या मुुलाला त्याच्या आईने किडनी देऊन जीवनदान दिले आहे. शोभा पांचाळ अनंत पांचाळ असे त्या दोघा मायलेकाचे नाव आहे. आईने केलेल्या किडनीदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

रेणापूर तालुक्यातील (जि. लातूर) कोळगाव येथील २३ वर्षीय अनंत बाबूराव पांचाळ हा बीकॉमच्या शेवटच्या वर्षात असतानाच त्याला पचनाबाबात समस्या निर्माण झाली. पित्ताशयाचा त्रास असल्याचा समज करून औषधी घेतली. मात्र, त्रास वाढतच होता. लातूरच्या डॉक्टरांना दाखवले. त्यांनी दोन्ही किडन्या (मूत्रपिंड) निकामी झाल्याचे निदान केले. 

त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. वडील मजुरी, तर भाऊ वेल्डिंगचे काम करत उदरनिर्वाह करतात. तरीही त्यांनी उपचारात कसूर ठेवली नाही. त्यांना अनंतला औरंगाबादच्या एमजीएममध्ये उपचारासाठी दाखल केले. तो गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबादेत आहे. 

समाजबांधवअन् कर्जातून केले ऑपरेशन 
अनंतपांचाळ याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे तत्काळ उपचार करणे आवश्यक होते. समाजबांधव आणि नातेवाइकांनी पै पै जमा केली. कुटुंबाने कर्जही काढले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई शोभा पांचाळ यांनी स्वत:ची किडनी मुलाला दिली आणि मुलाला जीवनदान मिळाले. हॉस्पिटलचा खर्चही सहा लाखांच्या वर गेला आहे. डॉक्टरांनी चार महिने शहरात राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा बिकट परिस्थितीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन भाऊ गुणवंत पांचाळ यांनी केले आहे. 

दानशूरांनी मदत करावी 
माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असताना आईने एक किडनी मला देऊन पुनर्जन्मच दिला आहे. मात्र, परिस्थितीच्या मानाने उपचारासाठी खूप खर्च आला आहे. समाजबांधव आणि दानशूरांनी मदतीचा हात द्यावा.
-अनंत पांचाळ 
बातम्या आणखी आहेत...