आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुकल्यासाठी दूध आणते असे सांगत मुल दूसऱ्याकडे देऊन पळून गेली माता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सकाळी साडेसातची वेळ. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पानदरिबा येथील शब्बर दवासाजसमोर रुग्णांची रांग लागलेली. अचानक एक बाई त्या ठिकाणी आली आणि तिच्या हातातील तीन महिन्यांचे मूल दवासाजसमोरील एका महिलेच्या मांडीवर ठेवले. मी समोरच्या दूध डेअरीतून येते तोपर्यंत याला सांभाळा, असे सांगून ती महिला निघून गेली, ती परतलीच नाही. कपड्यात गुंडाळलेले ते तीन महिन्यांचे मूल टाहो फोडत होते.
"त्या' निष्ठूर मातेचा शोध सुरू झाला. मात्र ती कुठेच सापडली नाही. ज्या दूध डेअरीत जाते असे सांगून ती गेली होती, त्या ठिकाणीदेखील तिची चौकशी केली. मात्र तशी कोणतीही बाई त्या ठिकाणी आलीच नसल्याचे दूध डेअरीच्या मालकाने सांगितले. अखेर या भागातील रहिवासी लक्ष्मीनारायण बाकरिया यांना या अभागी बाळाची दया आली.
पेहलवान म्हणून ओळख असणाऱ्या बाकरियांचे हृदय पाझरले. त्यांनी त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला. त्याच्या आईचा शोध घेतला. मात्र सर्व प्रयत्न विफल ठरल्यानंतर त्यांनी सिटी चौक पोलिस ठाणे गाठले आणि त्या बाळाला पोलिसांकडे सुपूर्द केले. सध्या हे बाळ दूध डेअरी चौकातील बाल कल्याण समितीत ठेवण्यात आले आहे. तेथील कर्मचारी त्याची देखभाल करीत आहेत. अज्ञात आई - वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत.

फोटो - चिमुकल्यासह लक्ष्मीनारायण बाकरिया.
बातम्या आणखी आहेत...