आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुकल्या मुलीसह आईची रेल्वेखाली उडी, मुलगा होत नसल्याने सुरू होता सासरच्यांकडून छळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळास कंटाळून एका मातेने दोन वर्षांच्या मुलीसह रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ ऑगस्ट रोजी मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात घडली.

वैशाली सिल्लोडकर (२५, रा. शिवाजीनगर) हिचे लग्न महेश संतोष सिल्लोडकर (३०) याच्याशी मे २०१३ मध्ये झाले होते. लग्नानंतर एक वर्षापर्यंत सासरच्या मंडळींनी तिला चांगले वागवले. तिला मुलगीही झाली. त्यानंतर मात्र किरकोळ कारणावरून महेशने तिला मारहाण करणे, उपाशी ठेवण्याचे प्रकार सुरू केले. तसेच कार घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये आण, अशी मागणी केली, परंतु ती पूर्ण होत नसल्याने तिचा छळ सुरू केला. यास कंटाळून वैशालीने दोन वर्षांच्या मुलीसह १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घर सोडले. घाबरलेल्या महेशने लगेच पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत पत्नी मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. १५ ऑगस्ट रोजी सकाळी च्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे एका महिलेने तिच्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समोर आले. पुंडलिकनगर पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात नेला. वैशालीच्या भावाकडून दोघींची ओळख पटली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन मिरधे करत आहेत.

अन्वडील बसस्थानकावर थांबले : वैशालीघरातून निघून गेल्यानंतर महेशने तिच्या वडिलांना फोन करून तुमची मुलगी घरातून निघून गेल्याचे सांगितले. यामुळे ती माहेरी येत असेल या आशेने वडील रघुनाथ प्रजापती (५५, रा. किनगाव खुर्द, ता. यावल, जि. जळगाव) जळगाव बसस्थानकावर येऊन तिची वाट पाहत थांबले. परंतु ती आल्याने वैशालीचा भाऊ मेहुण्याने औरंगाबादला येऊन शोध सुरू केला. तेव्हा सकाळी तिने आत्महत्या केल्याचे समजले. प्रजापती यांच्या तक्रारीवरून पती महेश, सासरा संतोष सासू देविका सिल्लोडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...