आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनेच घोटला मुलीचा गळा, पंख्यावरील धुळीमुळे उलगडले मृत्यूचे गूढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सासूबदनामी करते म्हणून सुनेने सासूचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आईनेच पोटच्या मुलीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
पंख्याला ओढणी बांधून मोनिका भाऊसाहेब साबळे या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी हर्सूल भागात घडली होती. पण तपासात पंख्यावर माखलेली धूळ जशास तशी आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाची तक्रे उलटी फिरवताच मुलीचा खून आईनेच केल्याचे समोर आले. अनिता म्हसू नरोडे हिच्याविरुद्ध ३०२ कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी दिली.
पुढील स्‍लाइडवर वाचा का आली पोलिसांना शंका :
बातम्या आणखी आहेत...