औरंगाबाद - अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त अग्रवाल समाजाच्या वतीने सिडको येथील अग्रसेन भवनमध्ये २० ते २४ सप्टेंबरदरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शनिवारी (२० सप्टेंबर) रोजी घेतलेल्या सुपरमॉम स्पर्धेत आई आणि मुलांनी गाण्यांवर ताल धरला. "जो है अलबेला मदनैनोवाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है' यासह अनेक गाण्यांवर जल्लोष करण्यात आला.
अग्रवाल महिला समिती आणि अग्रवाल युवा मंच, बहु-बेटी समाजाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सापसिडी, मास्क डेकोरेशन, पौष्टिक ब्रेकफास्ट, बुबळ स्पर्धा, सुपरमॉम, पॉपकॉर्नचे दागिने, अंताक्षरी आणि कबड्डी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये महिला, पुरुष, तरुणांसह बच्चे कंपनीही जल्लोषात सहभागी झाली. सुपरमॉम स्पर्धेत आई आणि मूल यांच्यासाठी हा खास आव्हान देणारा राउंड ठेवण्यात आला होता. यात "ओ राधा तेरी चुनरी, ओ राधा तेरा छल्ला' या गाण्यानेही उपस्थितांचे लक्ष वेधले. आई आणि मुलांना एकत्र नृत्य करता यावे यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. भावनिक आणि मायेची ऊब असलेल्या या नात्याला प्रत्येकाने वेगळ्या पद्धतीने सादर केले. या स्पर्धांसाठी मनोहर अग्रवाल, विजय अग्रवाल, उमा अग्रवाल, सुनीता अग्रवाल, किरण अग्रवाल, आशिष अग्रवाल, शैलेश अग्रवाल, चेतना अग्रवाल, प्रीती अग्रवाल यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले. सुपर मॉम स्पर्धेचे परीक्षण गुरुलीन कौर आणि अंजली भराड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयश्री अग्रवाल, कीर्ती मल्लावत, गंगा अग्रवाल, स्वाती अग्रवाल, अंकिता अग्रवाल, नेहा अग्रवाल, सुरभी अग्रवाल, सानिया अग्रवाल, नेहा अग्रवाल यांनी सहकार्य केले.