आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटोरोलाच्या ग्राहकांना वर्षभरापासून मनस्ताप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संदीप कोंडके यांचा हडको भागात फायबरचे दरवाजे व खिडक्या बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी 18 मार्च 2011 रोजी मोटोरोला कंपनीचा एमबी-300 हा 1.6 अँड्रॉइड हँडसेट घेतला. हडको येथील एस्सारच्या ‘दि मोबाइल स्टोअर’मध्ये 14 हजार 739 रुपयांत हा हँडसेट मिळाला. या मोबाइलमुळे काम सोपे होईल, असे त्यांना वाटले होते; पण झाले उलटेच. या हँडसेटने महिनाभरातच रंग दाखवायला सुरुवात केली. मे महिन्यात मोबाइल सतत हँग होऊ लागला. आवाज खूपच कमी येत होता, तर म्युझिक प्लेयरही काम करत नव्हते. एवढे पैसे दिल्यानंतरही त्रास होत असल्याने त्यांनी एस्सारच्या मोबाइल शॉपीकडे विचारणा केली. मोटोरोला हँडसेटच्या सर्व्हिसिंगचे कंत्राट रेडिंग्टन इंडिया लिमिटेड कंपनीकडे आहेत, तर शहरात याची फ्रँचायझी जवाहर कॉलनी येथील इन्फिनिटी सर्व्हिस सेंटरकडे आहे. एस्सारच्या सांगण्यावरून कोंडके यांनी तेथे धाव घेतली.
दीड महिना मोबाइल ठेवला
इन्फिनिटी सर्व्हिस सेंटरकडे कोंडके यांनी हँडसेट दाखवला. त्यांनी तो रिप्लेस करून नवीन हँडसेट देण्याचे आश्वासन दिले. नवीन हँडसेट मिळाल्यामुळे कायमची कटकट मिटेल, असे त्यांना वाटले. या प्रक्रियेत दीड महिना उलटला. नंतर नवा हँडसेट मिळाला.
परत त्रास सुरू
बदलून मिळालेल्या नव्या हँडसेटचा आनंद क्षणभंगुर ठरला. पुन्हा 8-10 दिवसांतच जुना त्रास सुरू झाला. त्यांनी पुन्हा हा हँडसेट सर्व्हिस सेंटरला परत दिला. यावर त्यांनी पुन्हा दीड महिन्यानंतर नवीन मोबाइल दिला. तोही खराब झाल्यामुळे मे महिन्यापाठोपाठ जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही त्यांनी मोबाइल दुरुस्तीसाठी दिला.
दहा महिन्यांत सहा हँडसेट
दहा महिन्यांत त्यांना सहा वेळेस हँडसेट बदलून मिळाले; पण दरवेळेस ते व्यवस्थित न चालल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या हँडसेटला कंपनीतर्फे एका वर्षाची, तर एस्सारतर्फे आणखी एका वर्षाची वाढीव वॉरंटी देण्यात आली होती. मात्र, त्यापैकी तब्बल 7 महिने, तर हँडसेट सर्व्हिस सेंटरमध्ये पडून होता. दरवेळेस त्यांना मोबाइल चांगला चालण्याचे आश्वासन दिले जाते, पण पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असाच प्रकार होतो.
मेटेंचीही हीच समस्या
हसरूल भागात राहणारे पांडुरंग मेटे यांनीही मोटोरोलाचे हेच मॉडेल प्रोझोन मॉलमधील क्रोमा दालनातून घेतले. त्यांनाही हीच समस्या भेडसावत आहे; परंतु कामाच्या व्यग्रतेमुळे त्यांनी याबाबत अद्याप कुणी घातला झाडांवर घाव?
तक्रार केलेली नाही. कोंडके यांचा अनुभव पाहता त्यांनी आहे त्या अवस्थेत हँडसेट सुरू ठेवण्याचा विचार केलाय. गाणे नको, इंटरनेट नको आणि हेडफोनही नको, केवळ कॉल घेता आला तरी पुरे, असे त्यांचे म्हणणे आहे.
हँडसेट सपोर्ट करत नाही
कंपनीने या प्रकारासाठी कोंडके यांनाच जबाबदार धरले आहे. हा हँडसेट 1.6 अँड्रॉइड सिस्टिमलाच सपोर्ट करतो. यापेक्षा कमी क्षमतेच्या अँप्लिकेशन्सच यात चालतात, असे कंपनीचे म्हणणे आहे; पण ऑपरेटिंग सिस्टिम कोणतीही असली तरी सर्वच अँप्लिकेशन्स चालायला हवेत, असे कोंडके म्हणतात. अन्य हँडसेटमध्ये अशी समस्या येत नाही, असा दावाही त्यांनी केलाय.
पैसे परत करा
मोटोरोलाच्या हँडसेटमुळे फायदा तर दूरच, उलट प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतोय. कंपनी माझ्या मोबाइलच्या किमतीचे दुसरे मॉडेल द्यायला तयार नाही. स्वस्तातले मॉडेल घेणे म्हणजे पैसे देऊन नुकसान केल्यासारखे आहे. त्यापेक्षा कंपनीने माझे पैसे परत करावेत. अन्यथा ग्राहक मंचात जाण्याशिवाय पर्याय नाही.
संदीप कोंडके, त्रस्त ग्राहक
पैसे देता येत नाहीत
कोंडकेंना आम्ही वार्‍यावर सोडलेले नाही. आम्ही त्यांना फायर-एक्स टी हँडसेट द्यायला तयार आहोत. पण ते डी-5 वर अडून आहेत. कोणत्या हँडसेटला कोणता रीप्लेसमेंट द्यायची याचे नियम ठरलेले आहेत. पैसे परत देताच येत नाहीत.
किशोर कदम, संचालक, इन्फिनिटी सर्व्हिस