आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पब्लिक मेमरी "शॉर्ट टर्म' असते : अशोकराव चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- काल काय झाले ते आज लोकांना सांगावे लागते. म्हणून पब्लिक मेमरी ही शॉर्ट टर्म मेमरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारने केलेल्या कामांचा प्रचार करावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. रविवारी श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये पार पडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते.
उद्धवमध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता नाही :
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शिवसेनेत कार्यकर्त्यांना सन्मान नाही. मातोश्रीवर गेलेल्या नेत्यांना ते भेटत नाहीत. एका कार्यक्रमात उद्धव म्हणाले, मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. मात्र, ते इतक्या बारीक आवाजात बोलले, त्यामुळे पुरुष बोलतो की बाई, हे ओळखू येत नव्हते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता नाही. केवळ मुंबई महापालिका आणि वरखर्चाला ठाणे महापालिका अशी त्यांची अवस्था आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या लायक उमेदवार नाही. याउलट काँग्रेसमध्ये स्टेजवर बसलेल्या अर्धा डझन उमेदवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता आहे.
मरगळ झटका :
कार्यक्रमाच्या प्रारंभी राणे यांनी बैठकीला आलेल्या कार्यकर्त्यांवर टीका केली. मरगळ झटकून कामाला लागण्याचे आवाहन केले. बैठकीलादेखील कार्यकर्ते उशिरा येत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये शिस्त महत्त्वाची आहे आणि ती पाळली पाहिजे. हा पराभव शेवटचा पराभव आहे. पुन्हा पराभव होऊ देणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार रजनी पाटील, आमदार सुरेश जेथलिया, डॉ. कल्याण काळे, माजी आमदार सुरेश नवले, धोंडिराम राठोड, नामदेव पवार, एम. एम. शेख, अनिल पटेल यांची उपस्थिती होती.
दस्ती बदलून फायदा होत नाही
निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षातून लोक निघून जातात. मात्र, लोकांना माहिती आहे की दस्त्या बदलल्या, तरी फार फरक पडत नाही. आपल्याकडे असताना त्यांनी कोणते प्रश्न सोडवले, तिकडे जाऊन काय करणार, हे लोकांना माहीत असल्यामुळे लोक विसरणार नाहीत, अशा शब्दांत पक्षातून गेलेल्या लोकांना त्यांनी टोला लगावला.

एकोपा नसेल, तर नुकसान...
चव्हाण म्हणाले, उमेदवारीची घोषणा नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. उमेदवारांची कमतरता नाही. मात्र, तिकीट मिळाले नाही म्हणून त्याला पाडणार, अशी भावना ठेवली, तर मोठे नुकसान होईल. लोकसभेला काँग्रेसची लाज मराठवाड्यानेच राखली, हे सांगायला ते विसरले नाहीत.