आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Chandrakant Kaire Write A Letter To Municipal Commissioner

आमने-सामने: खासदार चंद्रकांत खैरे यांचे आयुक्तांना खरमरीत पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्यांची कामे होत नसल्याबद्दल तीव नाराजी व्यक्त करीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना खरमरीत पत्र लिहीत संताप व्यक्त केला आहे. खड्डय़ांमुळे नागरिकांना मान शरमेने खाली घालावी लागत आहे. गार्‍हाणी मांडण्यासाठी तुम्ही मनपात सापडत नाहीत, आयुक्त म्हणून नागरिक तुमच्या कामाबाबत साशंक आहेत, असा थेट आरोप करीत खासदार खैरे यांनी आयुक्तांच्या सद्सद्विवेकबुद्धीला आव्हान दिले आहे.
खासदार खैरे यांनी आयुक्तांना दिलेल्या तीनपानी पत्रात केलेले आरोप असे..
>एसटी ऑफिस ते महापौर निवास हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशा नवरात्रोत्सवात सूचना दिल्या होत्या, तो रस्ता आजही आहे तसाच आहे. यावरून आपल्या वेळकाढूपणाची जाणीव होते.
>शहरातील रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्यासाठी दोन वर्षांत सात कोटी खर्च केले; पण खड्डे तसेच आहेत. त्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे.
>खड्डे बुजवण्याबाबत आपण गंभीर नसल्याने मनपाच्या कारभारावर टीका होत असते. रस्ते चांगले नाहीत, फुटपाथवर फेरीवाल्यांचे राज्य आहे, चौकाचौकात अतिक्रमणे होत आहेत यामुळे नागरिकांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे.
>दोन महिन्यांपासून खड्डे बुजवा, असे मी सांगत असूनही आपल्या वेळकाढू, नकारात्मक भूमिकेमुळे शहराच्या विकासाची वाट लागली हा आरोप वावगा ठरू नये.

आयुक्त म्हणतात, प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, 30 कोटींच्या रस्त्यांचे काम घेतले. सर्वात वाईट रस्त्यांचे काम या 30 कोटीतून होईल. त्यात जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाका रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाईल. एसएससी बोर्ड ते पीरबाजार आणि सतीश मोटर्स ते वीर सावरकर चौक हे वाईट रस्ते यातून केले जातील. अनेक रस्त्यांचे मागील 6-7 वर्षांत काम झालेले नाही. त्यामुळे खड्डे अधिक झाले. 30 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा दोन दिवसांत निघणार असून लवकरच ही कामे सुरू होतील.