आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MP Chandrakant Kaires Son Marriage Issue At Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदारपुत्राच्या विवाह सोहळ्यात नेत्यांचे स्नेहमिलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खासदार चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश खैरे यांच्या विवाह सोहळय़ाच्या निमित्ताने सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे स्नेहमिलन पाहायला मिळाले. शिवसेना नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, रामदास आठवले यांच्यासह विविध पक्षांचे नेते, उद्योजक, अधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते यांनी या सोहळय़ाला हजेरी लावली.

खासदार चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश आणि प्रज्ञा यांचा विवाह सोहळा बुधवारी सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर थाटात पार पडला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर विविध संत-महंतांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले. त्यानंतर मुख्य विवाह सोहळा पार पडला. या वेळी वधू - वरांना आशीर्वाद देण्यासाठी विविध पक्षांचे राजकीय नेते, नगरसेवक, अधिकारी, नागरिक मोठय़ा संख्येने हजर होते. या विवाह सोहळय़ाला हजेरी लावणार्‍या प्रमुख नेत्यांमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर, खासदार राजकुमार धूत, रावसाहेब दानवे, अनिल देसाई, रिपाइं नेते रामदास आठवले, विश्वनाथ नेरुरकर, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, किशनचंद तनवाणी, बदामराव पंडित, अर्जुन खोतकर, नामदेव पवार, अण्णासाहेब माने, संदिपान भुमरे, उत्तराखंडचे शिवसेनेचे राज्याध्यक्ष गौरवकुमार, भाजप नेते अतुल सावे, विजया रहाटकर, झारखंड शिवसेनेचे पदाधिकारी, पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, माजी मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.