आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत खैरे म्हणाले... कोणीही येऊ द्या, मला दैवी आशीर्वाद, पुन्हा मीच होणार खासदार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत या वेळी प्रथमच खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार असणार आहे. भाजपकडून कोण, याची जोरदार चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. परंतु शिवसेनेकडून सलग चार वेळा खासदार राहिलेल्या खैरे यांना याची अजिबात चिंता नाही.
 
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अतुल सावे प्रशांत बंब, माजी शहराध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यापैकी कोणीही आले तर स्वागतच आहे. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. मला दैवी आशीर्वाद आहे, त्यामुळे मीच पुन्हा खासदार होणार असा दावा खैरे यांनी केला आहे.
 
जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभेत युती झाली तर प्रश्नच नाही, परंतु नाही झाली तरी मला चिंता नाही, असे सांगताना मंगरुळे मैदानात आले तर उत्तमच पण हरिभाऊ, रहाटकर, सावे, बंब यांच्यापैकी कोणीही असले तरी खासदार होईल तर मीच. माझ्याकडे काहीच नाही, पैसाही नाही. मात्र माझ्या पाठीशी शिवसेना आहे, दैवी शक्ती आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा माझ्यावर टीका होते, तेव्हा तेव्हा माझे मताधिक्य वाढले आहे.
 
मोदींमुळे मिळाली फक्त ५२ हजार मते : गतनिवडणुकीत मोदी लाटेमुळे खैरे विजयी झाल्याचे भाजपकडून मुद्दाम सांगितले जाते. यावर खैरे म्हणाले, मला लाख २० हजार मते मिळाली. त्यातील अवघी दहा टक्के मते म्हणजेच ५२ हजार मते मोदींमुळे मिळाली. प्रत्यक्षात माझे मताधिक्य दीड लाखांचे आहे. त्यामुळे मोदींची मते मिळाली नसती तरी चित्र बदलले नसते.
 
कन्नड, गंगापूर तालुक्यात फायद्याची रणनीती
खैरेयांच्या मतदारसंघात येणाऱ्या कन्नड येथे सेना आमदार हर्षवर्धन जाधव कोणालाही जुमानत नाहीत. तेव्हा खैरे यांनी तेथे नवा पर्याय उभा केला असून गतवेळी थोड्या मतांनी पराभूत झालेले उदयसिंग राजपूत शिवसेनेत प्रवेश करते झाले आहेत. याचा फायदा खैरे यांना लोकसभा निवडणुकीत होईल. इकडे गंगापूर विधानसभा कृष्णा पाटील डोणगावकर लढतील हेही पक्के झाले आहे. त्यांचाही फायदा खैरे यांनाच होणार आहे. त्यामुळे जाधव यांचे सेनेपासून दुरावण्याने होणारी काहीसी हानी भरून निघेल, असे खैरे यांचे गणित आहे.
बातम्या आणखी आहेत...