आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरचे काम तत्काळ सुरू करा, असंतोषाचा भडका उडाल्यानंतर खासदार खैरे यांनी अखेर घेतली बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर जलवाहिनीबाबत नागरिकांच्या असंतोषाचा भडका उडाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनीही विरोधाची भूमिका घेताच लवकरच समांतरबाबत बैठक घेऊ, असे सांगणा-या खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज अखेर बैठक बोलावली. त्यात जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याची सूचना खैरे यांनी केली.
सलग नऊ दिवस पाण्याचा खेळखंडोबा झाल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरत समांतर जलवाहिनीला विरोध सुरू केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनीही नागरिकांची बाजू घेत समांतरला विरोध सुरू केला होता. यामुळे हादरलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांच्या नावाखाली समांतरला विरोध न करण्याचे सांगितले होते. तुमचा काही रोष असेलच तर आपण ३ जानेवारीला बैठक बोलावू, असे सांगितले होते; पण ही बैठक लांबतच चालली होती. अखेर त्यास आज मुहूर्त लागला. सुभेदारीवर झालेल्या या बैठकीला जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा, सभागृह नेता किशोर नागरे, गटनेता गजानन बारवाल, विरोधी पक्षनेता रावसाहेब गायकवाड, मीर हिदायत अली, आयुक्त प्रकाश महाजन, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, शहर अभियंता सखाराम पानझडे, हेमंत कोल्हे, सिटी वॉटर युटिलिटीचे अर्णब घोष, राम मुंदडा, कार्तिकेयन, के. एम. फालक, यू. जी. शिरसाठ, शिवाजी झनझन यांची उपस्थिती होती. या वेळी खैरे यांनी अधिका-यांच्या संवादातील अभावामुळे दिवसेंदिवस योजनेला उशीर होत असल्याचा ठपका ठेवत पैठणहून पाइपलाइन टाकण्याच्या कामाला प्रारंभ करा, अशा सूचना दिल्या. डीपीआर प्लॅनच्या मंजुरीअभावी काम सुरू करण्यास उशीर होत असल्याचे शहरात पाणी वितरीत करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटीलिटी कंपनीकडून सांगण्यात आले.

आधी काम करावे, नंतरच वसुली
कंपनीला विरोध नसून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला आम्ही विरोध करत आहोत, एजन्सीने आधी काम करावे, नंतर पाणीपट्टी वसुली करावी.
प्रदीप जैस्वाल, शिवसेना महानगरप्रमुख