आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यावर संशय व्यक्त करणारे दिल्लीत गप्प का?- खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बजाजनगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले. (छाया : संतोष उगले) - Divya Marathi
बजाजनगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले. (छाया : संतोष उगले)
वाळूज - मुंबईत झालेला मराठा क्रांती मोर्चा इतर कारणांवरून माझ्यावर संशय व्यक्त करणाऱ्यांनी आजवर दिल्लीमध्ये का मराठा समाजाची भूमिका मांडली नाही? मी एकमेव खासदार आहे, ज्याने समाजाची भूमिका ठामपणे संसदेमध्ये मांडून देशाचे सरकारचे लक्ष मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांकडे केंद्रित केले, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी बजाजनगर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
 
मराठा क्रांती मोर्चा आटोपून घराकडे परतणाऱ्या बजाजनगर गाजगाव येथील मोर्चेकऱ्यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्या मुलांच्या कुटुंबीला भेटण्यासाठी आलेल्या संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदे मत व्यक्त केले. 
 
...त्यांना समर्थन नसणार 
मी छत्रपतींचा वंशज म्हणून त्यांची विचारधारा समाजमनावर बिंबवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत आहे. कायदा हातात घ्या, असे सांगणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि जो कोणी कायदा हातात घेईल त्यांच्या समर्थनार्थ मी कधीच नसणार. असेही छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...