आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार खैरेंनीच दिला कंपनीला "अल्टिमेटम'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समांतरच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना झापताना खासदार चंद्रकांत खैरे. - Divya Marathi
समांतरच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना झापताना खासदार चंद्रकांत खैरे.
औरंगाबाद-खासदार चंद्रकांत खैरे समांतर जलवाहिनीला कायम पाठीशी घालतात या समजाला आज खुद्द खासदार खैरे यांनीच तडा दिला. थेट मुख्यमंत्र्यांनीच या योजनेच्या चौकशीचे आदेश दिल्याने अस्वस्थ झालेल्या खैरे यांनी आज समांतरच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावले पहिल्या वाक्यापासून धारेवर धरले. आजपासून मीटर बसवणे थांबवा, २४ तास पाणी द्यायला सुरुवात करण्याआधी महिनाभरात मीटर बसवा, येत्या दहा दिवसांत जायकवाडी ते औरंगाबाद पाइपलाइनचे काम सुरू करा असे आदेश त्यांनी समांतरच्या अधिकाऱ्यांना दिले तर आता यांना सांभाळून घेणे खूप झाले, कंपनीला नोटिसा द्या असे आदेश मनपाच्या अधिकाऱ्यांना दिले.
गेल्या काही महिन्यांपासून समांतर जलवाहिनी याेजनेचे रोज वाभाडे निघत आहेत. गेल्या आठवड्यात तर विधान परिषदेतही या योजनेची लक्तरे टांगली गेली अखेर मुख्यमंत्र्यांना शेवटी योजनेची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागले. या साऱ्या प्रकारानंतर आज खासदार चंद्रकांत खैरे यांनी समांतर योजनेबाबत आज सायंकाळी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात मनपा आयुक्त प्रकाश महाजन, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीचे प्रकल्पप्रमुख सोनल खुराणा यांची उपस्थिती होती.

या बैठकीची सुरुवातच खासदार खैरे यांनी खुराणा यांना फैलावर घेत केली. योजना झाली पाहिजे, नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे म्हणून मी या योजनेच्या कायम पाठीशी आहे. लोक ओरड करत असतानाही केवळ योजना व्हावी यासाठी तुमची बाजू घेऊन बोलतो, पण तुमचा कारभार काही सुधारत नाही.

ते हैदराबादकडे उड्डाण भरेल.
या वेळी ट्रुजेटचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. उमेश, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी किशोरकुमार, सीएफआयचे पवार, रिलायन्स इंडस्ट्रीचे मनोज ओबेरॉय, विमानतळ व्यवस्थापक मोहिनी शंकर, ट्रुजेटचे व्यवस्थापक स्वप्निल हरकाळ, ए. बडवे आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या विमानसेवेचे उद््घाटन करण्यात आले. त्यानंतर विमान हैदराबादकडे रवाना झाले.
पाणीपुरवठा वेळेवर नाही, योजनेचे काम मंदगतीने सुरू आहे. दुसरीकडे मीटरच्या नावाखाली नागरिकांना सक्ती करता. सगळेच जण आम्हाला नावे ठेवत आहेत, टीका करीत आहेत. विधानसभा, विधान परिषदेत चर्चा होते. नगरसेवक, मनपा प्रशासन आणि मी आमची बदनामी होत आहे ती तुम्ही काम करत नसल्याने. लोक आम्हाला तुमचे वकील, पार्टनर म्हणत आहेत. तुम्हाला त्याचे गांभीर्य आहे का नाही?

कंपनीलाहवी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची हमी : काममंदगतीने का सुरू आहे याबद्दल जाब विचारला असता कंपनीचे प्रकल्पप्रमुख सोनल खुराणा यांनी सणसणीत गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, कंपनीने २१ कोटींची गुंतवणूक केली आहे. पाइपलाइनसाठी पाइप लवकरच येतील. पण आम्हाला दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळण्याबाबत हमी मिळत नाही. ती दिल्याशिवाय आमचे फायनान्शियल क्लोजर होणार नाही. फायनान्शियल क्लोजरशिवाय आम्हाला बँक कर्ज देणार नाही.

खैरेभडकले, पानझडे संतापले : खुराणायांच्या या विधानावर शहर अभियंता पानझडेही चिडले. ते म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची हमी मिळेपर्यंत फायनान्शियल क्लोजर होत नाही हे चूकच आहे. मुळात करारच्या १९.२ कलमानुसार दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळो मिळो निधी उभा करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यांनी त्यासाठी काहीही करावे, मनपा त्यांची कालमर्यादा वाढवून देऊ शकते. आज पहिल्या टप्प्यातील २५० कोटी रुपये पडून आहेत, तुमचे ४०० कोटी रुपये टाका काम सुरू करा. कामाचे जे टप्पे ठरले आहेत, त्यानुसार मनपा पैसे देईल. खासदार खैरे तर भडकलेच.

ते म्हणाले की, इथे पहिल्या टप्प्याचे पैसे हातात आल्यावरही काम सुरू केले नाही आणि त्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची चिंता आहे. हा सगळा वरवरचा धंदा ठीक नाही. स्वत:चे पैसे टाकण्याची ताकद तुमच्या कंपनीत नाही का? तुमचे फायनान्शियल क्लोजर झाले नसेल तर मनपा तुम्हाला कसे पैसे देईल असेही खासदार खैरे यांनी विचारले.

पाइपलाइन टाका
खैरेम्हणाले की, तिकडे भूमिगत गटार योजनेचे काम किती चांगले सुरू आहे ते पाहा. मी एक वर्षापासून ओरडतो आहे काम जायकवाडीपासून सुरू करा. शहरात दुरुस्त्यांची कामे करत वेळ घालवू नका. आता पुरे झाले. येत्या दहा दिवसांत जायकवाडी ते नक्षत्रवाडी पाइपलाइनचे काम सुरू झालेच पाहिजे.

कंपनीलानोटीस द्या
यावेळी महापौर, सभागृह नेते, गटनेते मनपाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कारभारावर टीका केली. यानंतर खासदार खैरे यांनी कंपनीला नोटिसा द्या, अशा सूचना मनपा आयुक्तांना केल्या. उद्या कंपनीला नोटीस गेली पाहिजे असेही ते म्हणाले.

कंपनीचा डोळा अनामतीवर
खुराणायांनी मनपाकडे अनामत म्हणून भरलेली रक्कम पडून आहे, ती वापरू द्या असे विधान करताच पानझडे यांनी, अनामत ही तुम्ही काम अर्धवट सोडून पळून गेलात तर जप्त करण्यासाठी असते. काम सुरू करण्यासाठी नाही, असे ठणकावले. यावर खुराणा यांनी असे ठरवण्याचा मला अधिकार नाही हे सांगताच मग कशाला आलात, पुढच्या वेळी जबाबदारांना घेऊन या असे खैरे म्हणाले.

मीटरलावणे बंद करा
खैरेयांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मीटर लावण्याच्या विषयावरून फैलावर घेतले. मीटर लावू द्यावे म्हणून कंपनीचे लोक नगरसेवकांना लालूच देत आहेत. हे धंदे बंद करा. २४ तास पाणीपुरवठ्याचे उदघाटन होण्याच्या महिनाभर आधी मीटर बसवायला सुरुवात करा. आतापासून मीटर बसवणे थांबले पाहिजे. नाही तर मी स्वत: मीटर फोडून टाकीन.