आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मंत्रिपदासाठी आशीर्वाद द्या, खासदार खैरेंचे शांतीगिरी बाबांना साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी वेरूळ येथील महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची वेरूळ येथील आर्शमात जाऊन भेट घेतली. या वेळी खैरे यांनी शांतीगिरी महाराजांचे दर्शन घेत आपल्या आशीर्वादामुळेच सर्वाधिक मताधिक्य मिळाले, असे सांगत आता मला मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे यासाठी आशीर्वाद द्या, असे ते म्हणाले.

खैरे व महाराज यांच्यात किमान पाऊणतास चर्चा झाली. त्यांनतर आश्रम परिसरात असलेला सांस्कृतिक हॉल, विश्वशांती धाम कुटिया तसेच अन्य बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर घृष्णेश्वरास अभिषेक केला. खैरे यांनी महामंडलेश्वर भागवंतानंदजी गिरी महाराज व वामदेवानंदजी महाराज यांच्या आर्शमांना भेटी दिल्या. या वेळी एकलव्य भिल्ल संघटनेचे तालुका उपाध्यक्ष दीपक आव्हाड, नाना ठाकरे, संजय आव्हाड यांनी खैरे यांचे स्वागत केले. या वेळी सुहास दाशरथे, माजी आमदार अण्णासाहेब माने, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
निवडणुकीतील विजयानंतर बाहेर जावे लागले. आज निवांतक्षणी दर्शन घेत आहे. पाच वर्षांनंतर आर्शमातील विकासकामे पाहताना आनंद झाला. आता आपलेच सरकार आल्याने केवळ विकास आणि विकासच होईल. लवकरच लाल दिवा मिळावा म्हणून महाराजांनी आशीर्वाद दिला आहे. चंद्रकांत खैरे, खासदार