आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार ओवेसी जवखेडे पीडितांची आज घेणार भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी शनिवारी सकाळी शहरात येत आहेत. सकाळी ७ वाजता विमानाने आल्यानंतर ते अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावातील पीडित दलित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना होतील.
९ वाजता ते अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद््घाटन आणि सायंकाळी ५ वाजता आमखास मैदान येथे आयोजित सभेस ते संबोधित करतील. त्यांच्यासमवेत आमदार इम्तियाज जलील, गंगाधर गाडे, डॉ. गफार कादरी आदी जवखेडे येथे भेट देणार आहेत.