आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार असदोद्दीन ओवेसींच्या सभेस औरंगाबाद पोलिसांचा नकार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिनचे (एमआयएम) अध्यक्ष व खासदार असदोद्दीन ओवेसी यांना शहरात सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे एमआयएमच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ओवेसी पदाधिकार्‍यांची निवड करण्यासाठी 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला शहरात येत आहेत. या दौर्‍यादरम्यान पक्षाच्या वतीने ओवेसी यांची रोजाबाग ईदगाह किं वा आमखास मैदानावर जाहीर सभा घेण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे या सभेस परवानगी नाकारली. एमआयएमच्या वतीने दाखल याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार असल्याची माहिती एमआयएम स्वागत समितीचे समन्वयक जावेद कुरेशी यांनी दिली. परवानगी न मिळाल्यास मोठय़ा हॉलमध्ये दोन दिवस सभा घेतली जाईल, असेही ते म्हणाले.