आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाता मारणाऱ्या खोतकरांसाठी दिल्ली दूरच, आमदारकीही गेली : दानवे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना सिल्लोडमधून मदतीचा हात देण्याचे अाश्वासन आमदार सत्तारांनी देताच खोतकरांची आमदारकी गेली. अशा अपशकुनी माणसाची साथ जनतेने सोडावी, असे अावाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी येथे पक्ष प्रवेश सोहळ्याच्या जाहीर कार्यक्रमात बोलताना केले. 


शिवसेनेचे गटनेते सुनील पाटील मिरकर, बसपाचे मराठवाडा झोन प्रभारी दादाराव आळणे यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी भाजपात प्रवेश केला. पक्षप्रवेश सोहळ्याच्या जाहीर सभेत दानवे बोलत होते. दोन महिन्यांपासून खासदार दानवे आमदार सत्तार यांची एकमेकांवर टीका सुरूच आहे. जनआक्रोश मोर्चाचे निमित्त साधून सत्तारांनी दानवे यांचेवर जिल्ह्यातील सभांत शरसंधान साधले होते. अपशकुनी सत्तारांच्या साथीने मला हरवण्याच्या बाता मारणाऱ्या खोतकरांसाठी दिल्ली तर दूरच, पण आमदारकीही गेली. 

बातम्या आणखी आहेत...