आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार सुप्रिया सुळे आज शहरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आयोजित तीनदिवसीय मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबिराचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शुक्रवारी एमजीएमच्या मैदानावर करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड राहतील. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री सुरेश धस, फौजिया खान यांची प्रमुख उपस्थिती राहील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी कळवले आहे.