आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार ‘उमेद’; खा. सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत उद्या कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेतकरी आत्महत्यानंतर कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘उमेद’ उपक्रमाची सुरुवात मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. यशस्विनी सामाजिक अभियान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा उपक्रम कुटुंबांना स्वावलंबी करणारा आहे. औरंगाबादेतील याची सुरुवात गुरुवारी (२५ मे) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होत आहे. राष्ट्रवादी भवनमध्ये दुपारी वाजता २५ विधवांना याचा लाभ देण्यात येणार आहे. 

राज्यभरात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतही दिली जाते. मात्र, कुटुंबांचे कायमचे पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. यादृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी मराठवाड्यातील १६ मे ३४ वयोगटातील २०० विधवांची निवड करण्यात आली आहे. उपक्रमात समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मदतीच्या माध्यमातून महिलांना उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

महिलांना पिठाची गिरणी, दोन शेळ्या, पिको फॉल मशीन, शिलाई मशीन, शेवयांची मशीन अशी व्यवसाय साधने दिली जातील. याखेरीज औषधोपचारांसाठी हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील ३६ विद्यार्थ्यांच्या माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची जबाबदारीही घेण्यात आली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन उपक्रमाचे समन्वयक नीलेश राऊत, सुनीता मारग, गजल जमादार, रंजना राजपूत, सुनीता साखरे, हिरा वायकोस यांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...