आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून सुरू होणार ‘एमफिल’ची प्रवेशप्रक्रिया, नोंदणीसाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एम.फिल अभ्यासक्रमासाठीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (२२ जुलै) सुरू होणार असून १६ ऑगस्ट रोजी ऑनलाइन सीईटी होणार आहे, अशी माहिती प्रभारी अधिकारी डॉ.सतीश पाटील यांनी दिली.
 
विद्यापीठातील १८ विभागात एम.फिल अभ्यासक्रम सुरू आहे. यात मराठी, हिंदी, ऊर्दु, पाली, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र, लोकप्रशासन, ग्रंथालयशास्त्र, वाणिज्यशास्त्र, पत्रकारिता, गणित, व्यवस्थापनशास्त्र, संगणकशास्त्र आदी विभागांचा समावेश आहे. एमफिल प्रवेशपूर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यासाठी ‘निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम’ असणार आहे. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाचे ०. २५ गुण (चार प्रश्नाला एक गुण) वजा होणार आहेत. पेटच्या धर्तीवर ही प्रक्रिया राबवण्यात येईल. सर्व विभागांची एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑगस्टपर्यंत ऑनलाइन नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रभारी अधिकारी डॉ.सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२१) बैठक घेण्यात आली. या वेळी अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.मजहर फारुकी, डॉ.दिलीप खैरणार, डॉ.संजय साळुंके उपस्थित होते.
 
असे आहे वेळापत्रक : नोंदणी ऑप्शन फॉर्म भरणे (२२ जुलै ते ऑगस्ट), सीईटी (१६ ऑगस्ट) प्रथम यादी (२१ ऑगस्ट) , द्वितीय यादी (२६ ऑगस्ट), स्पॉट अॅडमिशन (२९ ऑगस्ट), सप्टेंबरपासून तासिकांना सुरुवात.
बातम्या आणखी आहेत...