आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 57 केंद्रांवर उद्या होणार एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील ५७ केंद्रांवर रविवारी (१६ जुलै) सकाळी ११ ते १२ या वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे.
 
परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराने आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक ओळखपत्र त्याची छायांकित प्रत सोबत आणावी, ११ नंतर उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या निळ्या शाईचा बॉलपेन, ओळखपत्र ओळखपत्राची छायांकित प्रत याशिवाय अन्य कोणतेही साहित्य वा वस्तू परीक्षा कक्षात घेऊन जाण्यास परवानगी नाही. डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाइल, ब्लूटूथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण परीक्षा कक्षात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षा केंद्राच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरिता बंदी घालण्यात येईल. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांमार्फत उमेदवाराची तपासणी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धिपत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
 
२०२५६ प्रवेशपत्रे पाठवली
परीक्षेच्यापर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. २०२५६ उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठवण्यात आली असून, या परीक्षेसाठी १७४३ अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली अाहे.
बातम्या आणखी आहेत...