आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससीचा खोटा पेपर विकणारी टोळी गजाआड, व्हाॅट्सअॅपवर पेपर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रविवारी होणाऱ्या कर सहायक पदाच्या परीक्षेचा बनावट पेपर खरा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना विकणारी टोळी पोलिसांनी पहाटे वाजता पकडली. सात परीक्षार्थींसह १४ जणांना सिडकोतील अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली. सोलापूरहून व्हाॅट्सअॅपवर पेपर पाठवणारा मात्र फरार आहे. एक पेपर १० ते १२ लाखांत या भावाने ७५ लाखांमध्ये हा सौदा ठरला होता.

सकाळी ११ वाजता होणारा हा पेपर फुटल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. एन -४ मधील पोणिक अपार्टमेंटवर पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा सात विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका मिळाल्याचे कळले. त्यांना ती उपलब्ध करून देणारे प्रतापसिंह महाजन काकरवाल (२८, तडेगाव वाडी, भोकरदन, जि. जालना ) आणि मिर्झा मोहसीन मंजूर अहमद (२३, भरतनगर, वानखेडेनगर, हर्सूल) हे मुख्य आरोपी घटनास्थळीच हाती लागले. काकरवालने जालन्यातून गतवर्षीची लोकसभा निवडणूक लढवली होत.

आरोपींत सात परीक्षार्थी
{अर्जुन बमनावत (२१,जटवाडा रोड)
{ कृष्णा मारग (२६,सह्याद्री हिल्स)
{ओमनाथ राठोड (२५,हर्सूल)
{संदीप मातेरे (२८,सिल्लोड)
{दत्तात्रय गोराडे (२७,सिल्लोड)
{संदीप शिंदे (२७,सिल्लोड)
{भानुदास बोरडे (२४,टीव्ही सेंटर)
दोन मुख्य आरोपी
१. प्रतापसिंह काकरवाल (२८,भोकरदन)
२.मिर्झा मोहसीन मंजूर अहमद (२३,वानखेडेनगर)

चार लाखांचा मुद्देमाल जप्त : पोलिसांनीघटनास्थळावरून लाख ७१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात १४ मोबाइल, एक संगणक, एक लॅपटॉप, कार्डरीडर, टाटा टेलिफोन, पुस्तके, प्रश्नपत्रिका संच आणि एक कार (एमएच २१, व्ही ८५७२) आहे.
पेपरमध्ये साधर्म्य नाही
पोलिसांनी जप्त केलेल्या मूळ प्रश्नपत्रिकेत कोणतेही साधर्म्य आढळून आले नाही. त्यामुळे बनावट पेपर खरा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकारी एका पोलिस अधिकाऱ्याने जप्त प्रश्नपत्रिकेशी मूळ पेपर ताडून पाहिला.
बातम्या आणखी आहेत...