आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mpsc\'s Preliminary Examination Goining Into Online : Sudhir Thakare

एमपीएससी पूर्वपरीक्षा होणार ऑनलाइन - सुधीर ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी एमपीएससी पूर्वपरीक्षा लवकरच ऑनलाइन होणार आहे. यामुळे परीक्षा पद्धतीत अधिक पारदर्शकता येईल, गोंधळ टाळता येतील, असा विश्वास एमपीएससीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी व्यक्त केला. रविवारी एका कार्यक्रमासाठी आले असता ‘दिव्य मराठी’शी बोलताना नव्या पद्धतीबद्दल त्यांनी ही माहिती दिली.

यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी परीक्षेचा पॅटर्न लागू केला आहे. गतवर्षीपासून परीक्षा वस्तुनिष्ठ झाल्यामुळे उत्तरपत्रिका सोडवणे सोपे झाले आहे. तथापि, प्रश्नांची उत्तरे त्यांना आता अधिक काळजीपूर्वक सोडवावी लागणार आहेत. कारण लवकरच आम्ही एमपीएससी पूर्वपरीक्षा पेपरलेस अर्थात ऑ नलाइन करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही पद्धत अवलंबल्यास पेपर देताच एमएस-सीआयटीप्रमाणे कदाचित त्यांना निकालही लवकर मिळू शकेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

सर्वच स्तरातून ‘नीट’ व इतर स्पर्धा परीक्षेत उर्दू व हिंदी भाषेच्या समावेशाची मागणी होत आहे. यावर ठाकरे म्हणाले, परीक्षा कोणत्या भाषेतून घ्यावी हा निर्णय शासनच घेईल. आम्ही फक्त धोरणाची अंमलबजावणी करू. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पीएसआय परीक्षेच्या निकालाबाबत ती प्रक्रिया कोर्टात सुरू असल्याने निकालास विलंब होत असल्याचे ठाकरे म्हणाले.