आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनची ‘रिपरिप’; दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मृग नक्षत्रात गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाने औरंगाबादकरांना चिंब भिजवले. शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी पडलेल्या 13 मिलिमीटर पावसाने सर्वजण सुखावले. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सुटीचा दिवस हेरून बाहेर पडलेल्या पालकांना रिपरिप पावसात भिजत शालेय साहित्याची खरेदी करावी लागली.

जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून पुढील दोन दिवसांत औरंगाबादसह विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. छत्र्या, रेनकोट, मेणकापड खरेदीला वेग आला आहे.

रविवारी तापमान घसरले होते. पण आद्र्रता वाढल्याने उकाडा जाणवत होता. मुंबई, पुण्यात सक्रिय असलेला मान्सून येत्या दोन दिवसांच्या आत औरंगाबादसह मराठवाडा व विदर्भाकडे आगेकूच करणार आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस होणार आहे. जूनमध्ये भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना वर्तवला आहे. पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या चार दिवसांत शहरात 40 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे लोकांनी आनंदाने खरेदीला सुरुवात केली आहे.

यंदा असे असेल नक्षत्रांचे देणे
दुष्काळाचा चटका बसल्याने सर्वांनाच चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. हवामान खात्याने चांगल्या पावसाचे भाकीत केले आहे, तर पंचांगात सर्वसामान्य पर्जन्यमानाचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. पावसाळय़ातील नक्षत्रांचे देणे यंदा कसे असेल ते दाते पंचांगात नमूद करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नक्षत्र आणि पर्जन्यमान.