आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्य अभियंत्यांच्या चौकशीचे दिले आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महावितरण (ऊर्जा) विभागात कार्यरत मुख्य अभियंता शंकर शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी भ्रष्टाचारमुक्त भार कृती समितीने निवेदनाद्वारे केली होती. त्याची दाखल घेत राज्य शासनाचे अवरसचिव सं. श. शिरसीकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीचे आदेश ३ फेब्रुवारी रोजी दिले. विनोद भालेराव यांनी निवेदनात म्हटले आहे, मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी जीटीएल कंपनीला मदत केली. त्यांनी स्वत:ची मालमत्ता पत्नीच्या नातेवाईकांच्या नावे केली. आर्थिक हितसंबंधातून मर्जीतील लोकांची कामे केली. याबाबत तक्रार करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिंदे यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी भालेराव यांनी केली होती.

खोट्या तक्रारी
ज्यांच्या वीज चोर्‍या पकडल्या तसेच ज्यांची नियमबाह्य कामे मंजूर केली नाहीत. नियमबाह्य बदल्यांच्या शिफारशी मान्य केल्या नाहीत, असे लोकं जाणूनबुजून खोट्या तक्रारी करत आहेत. मला अडचणीत आणण्यासाठी हे प्रकार केले जात आहेत. - शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण, औरंगाबाद.