आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी बसवर एसटी धडकली, नऊ प्रवासी जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - पाठीमागील दोन्ही टायर फुटल्याने पुणे-हिंगोली एसटी बस समोरील खासगी बसवर आदळली. या अपघातात एसटीतील 9 प्रवासी जखमी झाले असून, हा अपघात सोमवारी (24 जून) मध्यरात्री नगर-औरंगाबाद महामार्गावर वाळूजलगतच्या साई पेट्रोल पंपासमोर घडला. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्याहून निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस (क्र. एमएच 20 डीएल 1779) हिंगोलीला जात होती. सोमवारी मध्यरात्री वाळूजहून पुढे निघाल्यानंतर या बसचे पाठीमागील दोन्ही टायर अचानक फुटले. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस पुढे चालणार्‍या एका खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसवर (क्र. एमएच 20, डब्ल्यू 9991) धडकली. रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात एसटीतील झोपेत असलेल्या प्रवाशांना मोठा मार लागला. अनेकांची डोकी फुटली, तोंडालाही मार लागला. यात भास्कर मुसळे, पांडुरंग कावरे, सुरेश ढोकळे, किसनराव पावसवाल, मीरा गायकवाड, दिगंबर गायकवाड, तुकाराम राऊत व राजू त्र्यंबक घनदारे हे प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नवनाथ रामभाऊ पुरी (रा.परळी वैजनाथ, बीड) या बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.