आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमटीडीसी अध्यक्षपदासाठी भोगलेंच्या नावाची चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांना मुख्यमंत्र्यांनीच जॅकेट चढवल्यामुळे त्यांची वर्णी कुठे लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) अध्यक्षपदी त्यांचे नाव चर्चेत आहे.

राज्यातल्या महामंडळांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या अजूनही झालेल्या नाहीत. या महामंडळांच्या अध्यक्षपदावर राजकीय मंडळींची नेहमी नियुक्ती होते. त्यामुळे महामंडळांच्या कारभारावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, राज्य सरकारकडून कार्यक्षम कारभारासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एमआयडीसीच्या महामंडळावर अध्यक्ष म्हणून उद्योगमंत्री काम पाहत असतात, तर उपाध्यक्षपदी राज्यमंत्री काम पाहत असतात. मात्र, अनेकदा उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण तसेच मागास भागात एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योगाचे जाळे वाढावे यासाठी प्रयत्न करता येतील, अशी भोगले यांचीदेखील इच्छा असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.