आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलशुद्धीकरण केंद्रातील टाकीत साचला होता दाेन फुटांपर्यंत गाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फारोळा येथील जलशुद्धी केंद्राची वर्षानुवर्षे स्वच्छता केली नसल्याने औषधासह इतर घाणीचा दोन फुटांपर्यंत गाळ साचला असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तीन एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची जागा गाळाने व्यापली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. याच टाकीत दोन फुटांपर्यंत म्हणजेच ७० सेंटिमीटरपेक्षा जास्त गाळ साचला होता. तो आज साफ करण्यात आला. यात औषधासह विविध प्रकारच्या रसायनांचे कण आणि क्षार आढळून आले. या गाळाने जागा व्यापल्याने तीन एमएलडी पाणी कमी झाले होते.

केवळ दोन लाखांचा खर्च
महापालिकेने या कामावर केवळ दोन लाख रुपये खर्च केला आहे. खंडन काळामुळे केवळ एक दिवस पाणीपुरवठा उशिराने होणार आहे, पण सर्वांना वेळेवर पाणी मिळेल, असा दावा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी केला.

येथे पुरवठा पूर्ववत
क्रांती चौक, सिल्क मिल कॉलनी, नागसेननगर, एकनाथनगर, फुलेनगर, शिवाजीनगर, संघर्षनगर, चिकलठाणा, सुरेवाडी, मयूर पार्क, आंबेडकरनगर, बारी कॉलनी, कटकट गेट, एन १२, एन १, टीव्ही सेंटर परिसरासह अन्य भागांत पुरवठा करण्यात आला.
या भागांत आज पाणी पुंडलिकनगर,उल्कानगरी, गारखेडा, विद्यानगर, मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी, एन ३, एन या भागात शनिवारी नियमित वेळेत पाणी देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...