आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 व्या वर्षी कंपनी मालक, 4 वेळा दिवाळखोरी, तरीही मुक्तक जोशी ठरले यशस्वी उद्योजक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सोळाव्यावर्षी शाळेत शिकतानाचा आयटी कंपनीचा मालक. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना जगभर विस्तार, मात्र निर्णय चुकल्याने चार वेळा कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यातूनही तावून सुलाखून निघत हिंमत हरता पुन्हा केवळ व्यवसायच उभा केला नाही तर वयाच्या ३३ व्या वर्षी तो पुन्हा टॉपवर आणला.
 
असे अनेक चढ-उतार अगदी लहान वयात पार केलेल्या आयटी उद्योजक मुक्तक जोशी यांचा प्रवास खऱ्या अर्थाने रेअर शेअर ठरला. त्यांनी दोन तासांत तरुण उद्योजकांना अनेक टिप्स दिल्या. औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (एएमए) च्या वतीने गुरुवारी देवगिरी महाविद्यालयातील विश्वकर्मा सभागृहात ४३ वा रेअर-शेअर कार्यक्रम झाला. औरंगाबादच्या मातीत वाढलेल्या मुक्तक जोशी यांनी लहान वयात सॉफ्टवेअर व्यावसायिक म्हणून जगभर नाव कमावले.
 
त्यांनी आपला अनुभव या कार्यक्रमात विद्यार्थी आणि उद्योजकांसमोर मांडला. १९९४ ते २०१७ पर्यंतचा उद्योजकतेचा प्रवास त्यांनी मांडला. वयाच्या सोळाव्या वर्षी इंटरनेटवर पहिले सॉफ्टवेअर तयार करून ते विकले. त्याच वर्षी २३ सॉफ्टवेअर तयार करून जगभर विकले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समारोप उद्योजक मिलिंद केळकर यांनी केला. या वेळी एएमएचे अध्यक्ष उद्योजक सतीश कागलीवाल, मोहिनी केळकर, सुनील रायठठ्ठा, डॉ. सुनील देशपांडे आदींची उपस्थिती होती. 

मोदींच्या अमेरिकेतील सभेची सर्वाधिक तिकीट विक्री : अमेरिकेतीलमॅडिसन स्क्वेअर सभागृहात पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची ऑनलाइन तिकीट विक्री झाली. त्यातील साठ टक्के तिकीट विक्री ही मुक्तक जोशी यांच्या कंपनीने केली. तीही ३०० टक्के नफ्याने. 
 
वकील, सीए, अर्थसल्लागार महत्त्वाचे 
आपल्यायशाचे सूत्र सांगताना ते म्हणाले की, लहान वयात मी खूप ठोकर खाल्ल्या. त्यामुळे चांगला वकील, चांगला सीए चांगला अर्थसल्लागार आणि चांगला पार्टनर असणे खूप महत्त्वाचे ठरते. ही टीम चांगली असेल तर फसवेगिरी होत नाही. 
 
तिकिटांचे रिसेलिंग बेकायदा 
भारतात इंटरनेटवरून कोणत्याही कार्यक्रमाच्या तिकिटांचे रिसेलिंग बेकायदेशीर आहे. मात्र, परदेशात याला परवानगी आहे. ई-बेसारख्या कंपन्यांसोबत करार करून मी मोठा व्यवसाय केला. हा ट्रेंड भारतात यायला खूप वेळ लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कॉलेजच्या परीक्षेत अनुत्तीर्ण 
दहावीबारावीत त्यांनी जगभर ऑनलाइन पद्धतीने सॉफ्टवेअर विकसित केले; पण पुणे येथे अभियांत्रिकीला प्रवेश घेताच व्यवसाय बंद करावा लागला. पुन्हा तेथे जाऊन व्यवसाय उभा केला; पण कॉलेजला दांडी मारल्याने परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. पुन्हा औरंगाबाद गाठले. २००३ ते २०१३ या कालावधीत मुक्तक यांनी अनेक वेळा खडतर प्रवास केला. या काळात चार वेळा त्यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली. अशाही परिस्थितीत हार मानता त्यांनी २०१४ नंतर पुन्हा जगभरात नाव कमावले. अठरा तास काम करून कंपनी नफ्यात कशी आणली याचा प्रवास त्यांनी उभा केला. 
 
बातम्या आणखी आहेत...