आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादच्या नगराध्यक्षपदी मकरंदराजे निंबाळकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उस्मानाबाद नगराध्यक्षपदाचा पदभार उपाध्यक्षास सुपूर्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशास आैरंगाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती एन. डब्ल्यू. सांबरे यांनी स्थगिती दिली असून, तूर्तास अध्यक्षपदावर मकरंदराजे निंबाळकर राहतील; परंतु त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे.

उस्मानाबाद नगरपालिकेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष व विद्यमान नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांचे नगगरसेवकपद रद्द करण्याची मागणी त्यांचे प्रतिस्पर्धी उदयसिंह निंबाळकर यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली होती. सुनावणीप्रसंगी राज्यमंत्री पाटील यांनी मकरंदराजे निंबाळकर यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. उस्मानाबादचे नगराध्यक्ष िनंबाळकर यांना अपात्र घाेषित करून त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही, असेही आदेशात नमूद केले होते. राज्यमंत्र्यांच्या उपरोक्त आदेशाची प्रत मिळण्यापूर्वीच उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ३ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यासंबंधी उस्मानाबाद न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांना आदेशित केले. त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ७ डिसेंबरला नामांकन, ११ डिसेंबरला अध्यक्ष
निवडीची विशेष सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.
यासंबंधी न.प. च्या मुख्याधिकाऱ्यांना अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्ष निवडीच्या आदेशाला निंबाळकर यांनी हायकोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले. नैसर्गिक न्यायतत्त्वाचा अवलंब करण्यात आला नसून, बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नसल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. राज्यमंत्र्यांचा अपात्रतेचा आदेश रद्द करून अध्यक्ष निवडीस स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. हायकोर्टाने सुनावणीमध्ये ११ डिसेंबर रोजी होणारी अध्यक्षपदाची निवडणूक
स्थगित केली होती.
बातम्या आणखी आहेत...