आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मुकुंदवाडीतील दोन्ही रस्ते होणार चकाचक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुंदवाडीतील राजर्षी शाहू विद्यालय ते मनपा शाळा आणि पुढे मुकुंदवाडी गाव ते जुन्या स्मशानभूमीपर्यंतच्या दोन्ही रस्त्यांचा प्रश्न डीबी स्टारच्या पाठपुराव्यामुळे सुटला आहे. मनपाने या दोन्ही रस्त्यांसाठी 15 लाखांचा निधी मंजूर केला. त्यामुळे एकाच वेळी या दोन्ही रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत.
या दोन्ही रस्त्यांची दैना झाली होती. गेल्या दशकभरापासून लोक त्रास सहन करत होते. पावसाळ्यात तर लोकांना खड्ड्यांबरोबरच चिखलातून मार्ग काढावा लागत होता. महापालिकेकडे तक्रारी व निवेदने देऊनही उपयोग होत नव्हता, त्यामुळे या भागातील रहिवाशांनी अखेर दैनिकाकडे कैफियत मांडली. डीबी स्टारने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वारंवार विविध बातम्या लावून अधिका-यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर नगरसेवक नारायण कुचे, मनपाचे शहर अभियंता एम.डी. सोनवणे, वॉर्ड अभियंता पी. जी. पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावाही केला. त्यामुळे हे काम मार्गी लागले. मनपाने स्लम निधीतून आधी 10 लाखांचा व दुस-यांदा 5 लाखांचा निधी मंजूर केला. त्यामुळे एकाच वेळी मुकुंदवाडीतील या दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले.
लवकरच दोन्ही रस्त्यांची कामे पूर्ण होतील - या कामाकडे माझे व नगरसेवक नारायण कुचे यांचे बारकाईने लक्ष आहे. रस्त्यांचे काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल. सोबतच रुंदीकरणही होत आहे. - एस. आर. काथार, शाखा अभियंता,मनपा.
पाठपुरावा कामी आला - या कामाला डीबा स्टारने वाचा फोडली. त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला. त्यामुळे मीही पुढाकार घेऊन हा प्रश्न उपस्थित केला. अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळाले. - नारायण कुचे, नगरसेवक
अखेर काम मार्गी लागले - या कामासाठी आम्ही 15 लाखांचा निधी मंजूर केला आहे. नगरसेवक कुचे यांनीही त्यासाठी आवाज उठवला. अखेर हे काम मार्गी लागले. - एम. डी. सोनवणे, शहर अभियंता, मनपा
डीबी स्टारमुळेच कामाला गती मिळाली - आम्ही डीबी स्टारकडे कैफियत मांडल्यावर या दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले. वारंवार या कामासाठी पाठपुरावा केल्याने या अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामाला गती मिळाली आणि आमचा हा महत्त्वाचा प्रश्न सुटला. - गणेश बुट्टे, रहिवासी