आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : आरक्षणासहइतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा ३१ जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. गुरुवारी बिग बाझार, जालना रोड येथे क्रांती मोर्चाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन समाजातील महिला, युवतींच्या हस्ते झाले. त्यानंतर ही माहिती देण्यात आली.
 
कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाचा पहिला मोर्चा औरंगाबादेत निघाला. त्याच वेळी मुंबईमध्येही मोर्चा काढावा असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. गुरुवारी याबाबत निर्णय घेऊन त्यांची घोषणा करण्यात आली.
 किमान ५० लाख ते एक कोटी समाजबांधव मोर्चात सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. बैठकीस रवींद्र काळे पाटील, रमेश केरे पाटील, अप्पासाहेब कुठेकर, सतीश वेताळ, मनोज गायकवाड, अभिजित देशमुख, बाळासाहेब थोरात आदींसह २७ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...