आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Aurangabad Corporation Election Starts Soon

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका मतदानाला सुरूवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ मुंबई - नवी मुंबई आणि औरंगाबाद मनपासाठी मतदानाला सुरवात झाली आहे. दोन्ही शहरांमध्ये मतदनासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई पालिकेसाठी 111 प्रभागांसाठी 564 उमेदवार रिंगणात उभे आहेत तर औरंगाबादमध्ये 113 वॉर्डांसाठी 907 उमेदवार रिंगणात उभे आहेत.
नवी मुंबईत राष्ट्रवादीला आवाहन देण्यासाठी युतीनं मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आहे. तर औरंगाबादमध्ये सेना-भाजप युतीसमोर एमआयएमचे कडवं आव्हान उभे राहिले आहे. औरंगाबाद महापालिकेत सहाव्यांदा सत्तेत येण्यासाठी शिवसेनेने जोरदार कंबर कसली आहे.
औरंगाबादमधील चर्चेतील पाच वॉर्ड
१] गुलमंडी (खासदार खैरे यांच्या पुतण्याचे राजकीय भविष्य ठरणार)
२] समर्थनगर (खासदार खैरे यांच्या मुलाचे राजकीय भवितव्य ठरणार)
३] बाळकृष्णनगर (विद्यमान महापौरांचे काय होणार?)
४] मयूरनगर (शिवसेना व भाजपमधील बंडखोरांमुळे अत्यंत चुरस)
५] विद्यानगर (महापौरांच्या विद्यमान वाॅर्डात बाहेरचा की स्थानिकचा, हा मुद्दा)
११ बूथ संवेदनशील
निवडणूक विभाग व पोलिसांनी शहरातील ११ मतदान केंद्रे अति संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. त्यात हर्सूल, शहागंज, खाराकुवा, संजयनगर बायजीपुरा, राजनगर, जाफरगेट, चिकलठाणा, नारेगाव येथील केंद्रांचा समावेश आहे. तेथे अधिकचा बंदोबस्त तैनात आहे. याशिवाय एकूण ३८ केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तेथेही पोलिस नजर ठेवून असतील.