आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साईबाबा शिर्डी संस्थान नियुक्ती योग्यतेसाठी निपक्ष समिती नेमा; हायकोर्टाचे सरकारला अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- साईबाबा शिर्डी संस्थानमधील व्यवस्थापन समितीवर नेमलेले सदस्य योग्य  की अयोग्य हे ठरवण्यासाठी एक निपक्ष समिती नेमण्यात यावी, असे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. राज्य सरकारने 18 जुलै 2016 रोजी हे सदस्य नेमले आहेत. समितीने दोन महिन्यांत आपला निर्णय द्यावा. समिती जो निर्णय देईल त्यानुसार पात्र आणि अपात्रतेच्या नियमावलीनुसार विद्यमान समितीबाबत पुढील निर्णय घ्यावा, असे आदेश खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.

औरंगाबाद खंडपीठात साईबाबा शिर्डी संस्थानमधील व्यवस्थापन समितीच्या सदस्य नियुक्तीच्या 28 जुलै 2016 च्या अधिसूचनेला सचिन भांगे, दिलीप बोरधारे व इतरांनी आव्हान दिले आहे. या प्रकरणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. मंगेश पाटील यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवलेला निकाल आज दिला. 
या प्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे सतीश तळेकर, नितीन गव्हारे, विनोद सांगवीकर यांनी काम पाहिले. सरकारची बाजू ज्येष्ठ वकील विनायक दीक्षित, सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, सिद्धार्थ यावलकर यांनी मांडली. 

 

बातम्या आणखी आहेत...