आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court Says Create A Web Site For Satara Devlali Land

साताऱ्यातील प्रकल्पांची माहिती ऑनलाइन करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाई परिसरातील अधिकृत अनधिकृत मालमत्तांची ठळक माहिती सांगणारी वेबसाइट सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (हायकोर्ट) प्रशासनाला दिले आहेत. बांधकाम परवानगी, वैयक्तिक मालमत्तांची माहिती, गृह प्रकल्पांचे मंजूर आराखडे, विविध प्राधिकरणांकडून मिळालेल्या परवानग्या त्यावर अपलोड कराव्यात, असेही आदेश आदेश न्या. बी. पी. धर्माधिकारी न्या. ए. एम. बदर यांनी दिले आहेत. सातारा-देवळाईतील न्यायप्रविष्ट गृह प्रकल्पांसंबंधीचे आराखडे प्रस्तुत करणाऱ्या वास्तुविशारद, बँका, विविध वित्तीय संस्थांनी शपथपत्र दाखल करावे. यापूर्वीच्या आदेशात वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यासंबंधीच्या आदेशाचे पालन झाले नसल्याने तसेच विकासकांना नोंदणी करण्यासंबंधी कायद्यात काही तरतूद असेल तर त्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर शपथपत्र दाखल करावे, असेही आदेशित केले आहे.
सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामांसंबंधी नगर परिषदेच्या कारवाईस विरोध करणाऱ्या पंचवीस याचिका हायकोर्टात दाखल आहेत. यापूर्वीच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये न. प. कडे जमा करण्याचे आदेश दिले होते. तसेच दहा हजार रुपये जाहिरातीच्या खर्चापोटी विकासकांकडून जमा करण्यासंबंधी आदेशित केले होते. काही याचिकाकर्त्यांनी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवून याचिका मागे घेण्याची विनंती केली असता त्यांची विनंती नामंजूर करण्यात आली. या विकासकांनी दहा लाख भरण्याची हमी यापूर्वी देऊन अंतरिम स्थगितीचा लाभ घेतल्याने पैसे भरणाऱ्या याचिका मागे घेणाऱ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर मागे घ्यावी, असे स्पष्ट केले. शासनातर्फे सहायक सरकारी वकील अर्चना गोंधळेकर, याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, रामराजे देशमुख, सतीश तळेकर, तर न.प.तर्फे अ‍ॅड. तिवारी यांनी काम पाहिले.
बांधकामांना कुठल्या कागदपत्रांच्या आधारे वित्तसाहाय्य मंजूर केले, यासंबंधी शपथपत्र दाखल करावे. यात आयसीआयसीआय, महाराष्ट्र बँक, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, बडोदा आदींसह खासगी बँकांनी कायद्यानुसार वित्तपुरवठा केला का याबाबतही स्पष्टीकरण मागवले.
नगरविकास नगररचना संचालक, पुणे) : सातारा-देवळाईची स्वतंत्र वेबसाइट तयार करून अकृषक प्लॉट, अधिकृत वैयक्तिक मालमत्ता, रिकामे प्लॉट, विविध गृह प्रकल्प आदींची माहिती त्यावर अपलोड करावी. कुठला प्लॉट अधिकृत अथवा अनधिकृत आहे यासंबंधीची माहितीही द्यावी.
गृहप्रकल्पाचे बांधकाम करताना वास्तुविशारद अभियंत्यांचे नकाशे रेकॉर्डवर घेण्यात यावेत. ज्यांनी अशा प्रकल्पांमध्ये नकाशे सादर केले त्यांनी शपथपत्रे सादर करावीत. बांधकामासंबंधीचे टायटल, कागदपत्रे, नकाशे, सातबारा, खरेदीखत सादर केलेले फोटो यासंबंधीचे स्पष्टीकरण करावे.
चौदा जणांनी भरली रक्कम :
शरदराठोड, संतोष ठोळे (ग. नं. ९६), शेषराव राठोड (गट. नं. ८३), यमनाजी तांबे (गट. नं. ८३), शेख याकूब अहेमद, रामप्रसाद जाजू इतर शीला वैजीनाथ बोकारे इतर (१०३), अथर सालिन, धनंजय सिसन कांबळे, संतोष शेंगुळे, भाऊसाहेब बाळासाहेब म्हस्के (८१), इजाज खान अब्दुल समद खान (१०७), विनायक लक्ष्मणराव हिवाळे (१०८), मिर्झा कलीम (१०७), अमोल मोदी (१४०), राघवेंद्र नारायण चाकूरकर (११८)
उपरोक्त प्रकल्पातील विकासकांनी प्रत्येकी दहा लाख रुपये जमा केले आहेत. त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, एसबीआय, अभ्युदय बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीएच, अ‍ॅक्सिस, मलकापूर बँक, सुंदरलाल सावजी आदींनी वित्तसाहाय्य केले आहे.