आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Siddhartha Collage Issue Feedback In Gangapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडसाद: गंगापुरात 2 बसच्या काचा फोडल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर: मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेजचे माजी विश्वस्त व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या सर्मथकांमध्ये झालेल्या चकमकीचे पडसाद गंगापूर शहरात उमटले असून शहरातील शिवाजी चौक भागात अज्ञात हल्लेखोरांनी दोन बसच्या काचा फोडल्या.
शिवाजी चौकात सायंकाळी बस क्रमांक (एमएच 20 डी-7034 व एमएच 20 डी- 8730)या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी बस चालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 5 ते 7 जणांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मानसिंग राठोड करत आहेत.
दरम्यान बसथांब्याजवळ उभ्या असलेल्या शहर बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा प्रकार रांजणगाव शेणपुंजी फ ाट्यावर शुकवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडला. यामुळे काही काळ तणावाचे वाताव पसरला होता.