आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूंडेंच्या जयंतीदिनी वाहन रॅली अन् पायी दिंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपचेनेते तथा केंद्रीय ग्रामविकासमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (१२ डिसेंबर) वाहन रॅली आणि पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. जय भगवान महासंघातर्फे आयोजित रॅलीत मुंडे यांचा फूट उंचीचा आकर्षक पुतळा मांडण्यात येणार आहे. रॅलीत राज्यातील ३० ते ४० हजार लोकांचा सहभाग राहील, असा दावा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
दुपारी एक वाजता चिकलठाणा येथून वाहन रॅलीला सुरुवात होईल. जालना रोडमार्गे बाबा पेट्रोलपंप आणि त्यानंतर टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराज पुतळ्यासमोर रॅली विसर्जित होईल. रॅलीच्या मार्गावरील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर टीव्ही सेंटर येथून पुन्हा पायी दिंडी विद्यानगर (सेव्हन हिल्स) येथील भगवान गड संस्थान पर्यंत काढण्यात येणार आहे. भजनी मंडळ, झांज आणि लेझीम पथकांचा सहभाग असलेल्या दिंडीमध्ये मुंडे यांच्या भाषणांची संग्रहित ध्वनिफीत एेकवण्यात येणार असल्याचे सानप यांनी सांगितले. परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, हर्षवर्धन जाधव, संदिपान भुमरे, महापौर कला ओझा, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, माणिक मुंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सुहास दाशरथे, मुन्ना त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुंडे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर धनते, कार्याध्यक्ष राम दहिफळे, दिनेश भगुरे आदींनी केले आहे.