आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्याच दिवशी मनपाने काढली ६९ अतिक्रमणे, गणेशोत्सवानंतर मोहीम तीव्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पोलिसआयुक्त अमितेशकुमार आणि मनपा आयुक्त डॉ. प्रकाश महाजन यांच्या आदेशावरून महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी सकाळपासूनच जालना रोडवरील अतिक्रमणांवर घाव घालण्यास सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी चिकलठाणा विमानतळ ते मुकुंदवाडीपर्यंतची ६९ अतिक्रमणे काढण्यात आली. काही नागरिकांनी सौम्य विरोधही केला. मात्र, नंतर त्यांनी स्वत:हूनच अतिक्रमणे काढली.

मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांची पाहणी केली होती. त्याच वेळी त्यांनी चिकलठाणा विमानतळ ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत दोन्ही बाजूंची सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावारील अतिक्रमण काढण्याचे काम हाती घेण्यात आले. पहिल्याच दिवशी या पथकाने मुकुंदवाडीपर्यंत अतिक्रमणे काढली. काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढली. उर्वरित सर्व अतिक्रमणे मनपा प्रशासनाला काढावी लागली.

गणेशोत्सवानंतर रोशन गेट, कटकट गेट, रेल्वेस्टेशन, जवाहरनगर, मुकुंदवाडीतील अतिक्रमणे काढली जातील, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले की, सध्या सणासुदीचे दिवस आहेत. मंत्रिमंडळ बैठकीची तयारी सुरू आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा लागेल. तूर्तास मोठी मोहीम राबवली जाणार नाही. राजू तनवाणींच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यातही काही तक्रारी आल्या अाहेत. चोरीच्या कारमध्ये बसून फिरणाऱ्या वाळूज पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ दोन वर्षांसाठी थांबवण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. श्रुती कुलकर्णीचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, असा प्रयत्न असून महिनाभरात दोषारोपपत्र दाखल होईल. राज्य शासनाने दिलेल्या १४ आर्टिका कारपैकी एक दामिनी पथकाला दिली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
तगडा बंदोबस्त
यात१४ टपऱ्या, २८ शेड, नामफलक इतर १९ अशी एकूण ६९ अतिक्रमणे काढण्यात आली. सकाळपासूनच या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता. यासाठी पाच पोलिस निरीक्षक, ११ पोलिस कर्मचारी, त्यात तीन महिला, पाच वाहतूक पोलिस, नऊ लेबर, एक लाइनमन आदींचा समावेश होता.