औरंगाबाद - महापालिकेच्या वतीने चिकलठाणा विमानतळासमोरील कासलीवालपुरम सिद्धार्थ पुंडे यांच्यासह पंधरा मालमत्ताधारकांना चुकीच्या क्रमांकाने कर पावत्या पाठवण्यात आल्या आहेत. सिद्धार्थ एस. पुंडे हे वॉर्ड ई मधून ई 0013087 या मालमत्ता क्रमांकावर 2010 पासून कराचा भरणा करतात. परंतु 2014-2015 या वर्षी देण्यात आलेल्या कराच्या पावतीवर ई 0028824 हा चुकीचा क्रमांक टाकून 21 हजार 739 रुपये आकारण्यात आले आहेत.
चुकीच्या पावत्या वाटप...
सिद्धार्थ पुंडे यांना चालू वर्षात दुसऱ्या क्रमांकानुसार पावती दिली. यात पहिल्यांदा मालमत्ताधारकांचे नाव नसताना त्यावर वॉर्ड अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे. ही पावती वाटप केल्यानंतर काही दिवसांनंतर पुंडे यांना पुन्हा तिसरी पावती मिळाली. यातही चुकीचा क्रमांक असून सिद्धार्थ व पत्नी वैशाली पुंडे असे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मालमत्ता ही सिद्धार्थ यांच्या नावाने आहे. चिकलठाणा विमानतळासमोरील कासलीवालपुरम भागातील दीपेंद्र लक्ष्मीकांत निळेकर यांनाही अशीच पावती मनपा प्रशासनाने दिलेली आहे. एका दुसऱ्या प्रकरणातही ई ००१३०८८ या पावती क्रमांकानुसार कर भरणा केलेला आहे. यांनादेखील ई ००२८८२३ या क्रमांकाची चुकीची पावती दिली. हे मालमत्ताधारक दरवर्षी २ हजार ४२१ रुपये कराचा भरणा करतात यंदा त्यांना २१ हजार ७३९ रुपयांची नोटीस आली आहे.
अधिका-यांची चूक
या बाबत आमची काहीही चूक नाही. महानगरपालिकेच्या वतीने दोनदा नोटीस देण्याची चूक संबंधित वॉर्ड अधिका-यांची आहे. या संदर्भात वॉर्ड अधिका-यांनी आम्हाला कराची पावती रद्द करण्याबाबतचे पत्र पाठवणे गरजेचे आहे. त्यानंतर आम्ही संगणकात दुरुस्ती केली जाईल. अब्दुल बारी, संगणक कक्षप्रमुख, मनपा
अधिका-यांची चूक
या बाबत आमची काहीही चूक नाही. महानगरपालिकेच्या वतीने दोनदा नोटीस देण्याची चूक संबंधित वॉर्ड अधिका-यांची आहे. या संदर्भात वॉर्ड अधिका-यांनी आम्हाला कराची पावती रद्द करण्याबाबतचे पत्र पाठवणे गरजेचे आहे. त्यानंतर आम्ही संगणकात दुरुस्ती केली जाईल. अब्दुल बारी, संगणक कक्षप्रमुख, मनपा
काय म्हणतात मालमत्ताधारक
2010 पासून जुन्या पावती क्रमांकानुसार मालमत्ता कर भरणा केला आहे. परंतु यावर्षी मनपाने दिलेली पावती चुकीच्या क्रमांकाची आहे. यात 21 हजार 739 रुपयांचा कर लावलेला आहे. पावतीवर पती-पत्नीचे नाव टाकण्यात आलेले आहे. आम्ही 2014 पर्यंत मालमत्ता कर भरला असून ही पावती रद्द करावी.
सिद्धार्थ पुंडे, मालमत्ताधारक