आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest New In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका कर्मचार्‍यांचे वेतनही संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाटामुळे विकासकामांना निधी नसल्याची ओरड होत असताना मे महिन्यात जेमतेम 28 कोटी रुपयेच एलबीटी वसूल झाल्यामुळे प्रशासनाच्या पायाखालची जमीन घसरली आहे. पालिकेचा बंधनात्मक खर्च 35 कोटींपर्यंत असून, यात समाविष्ट असलेले कर्मचार्‍यांचे वेतन व भत्तेही यामुळे संकटात सापडले आहेत.एलबीटी रद्द करण्यासंदर्भात मे व जून महिन्यात सुरू असलेल्या हालचालींमुळे वसुली घटली आहे. व्यापार्‍यांनी 10 रुपये भरणा करण्यासारखे आंदोलन केल्याने त्याचाही परिणाम झाला आहे. औद्योगिक क्षेत्राने एलबीटीसाठी नेहमीप्रमाणे हात दिल्याने पालिकेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एलबीटीमधून मासिक 50 ते 55 कोटीपर्यंत वसुली होते. एप्रिलमध्ये हाच आकडा 45 कोटीपर्यंत घसरला होता. एलबीटी खात्याचा मासिक हिशेब 20 तारखेला होत असून, 20 जूनपर्यंत मे महिन्यात केवळ 28 कोटी रुपयेच जमा झाले. त्यामुळे सरासरी तुलनेत 27 कोटी रुपयांची मोठी तूट निर्माण झाली आहे. पालिकेचा आस्थापना तसेच बंधनात्मक खर्चच 35 कोटी रुपये मासिक इतका असून, 28 कोटी वसूल झाल्यामुळे आता आठ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. मागील जमा रकमेतून चालू महिन्यात कर्मचार्‍यांचे पगार, देखभाल खर्च निघेल; मात्र पुढील महिन्यात अशीच स्थिती राहिली तर कर्मचार्‍यांचे पगार कसे करायचे, या प्रश्नाने प्रशासन धास्तावले आहे.