आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest New In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्याचे काम रखडल्याने अर्धा किलोमीटरची पायपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक 82 भारतनगरातील सिद्धार्थ चौक ते सानेगुरुजी शाळेपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम आमदार राजेंद्र दर्डा यांच्या निधीतून करण्यात येत आहे. महिनाभरापूर्वी रस्ता खोदून त्यावर खडी टाकण्यात आली आहे. परंतु अद्यापही सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यात नागरिकांना जाण्या-येण्यासाठी त्रास होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. खडी टाकल्याने पाण्याचे टँकर गल्लीमध्ये येऊ शकत नसल्याने महिलांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम रखडल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.रस्त्यात टाकलेल्या खडीत पाय अडकून हंडे घेऊन जाणा-या महिला पडत आहेत. सानेगुरुजी शाळेपर्यंत सिमेंट रस्ता मंजूर झालेला असताना अर्धवट रस्ता तयार झाला आहे. महिनाभरापासून रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी शिवाजी जाधव, विठ्ठल पारटकर, भालचंद्र मुळे, उत्तम तांबे, नारायण कुमावत, अनिल बनकर, हिराबाई गरुड, द्रुपती फासाटे, सारिका चोरमागे, संगीता ढगे, कौसल्या सोनवणे आदींनी केली. तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमच्या प्रतिनिधींना 9765070333, 9028045199 या मोबाइल क्रमांकांवर समस्या कळवा.