आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

"समांतर'ला झटका, सिडकोत पाण्यासाठी आंदोलन, उपमहापौरांकडून अधिकारी धारेवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातीलपाणीपुरवठ्याची यंत्रणा ताब्यात घेऊन चारच दिवस झाले असताना पाण्याच्या तक्रारींवरून आज दिवसभर शहरात गदारोळ सुरू होता. सिडकोतील पाण्याच्या टाकीवर नागरिकांनी दोन तास आंदोलन केले, तर मनपात उल्कानगरीतील नागरिकांना तीन वर्षांपासून पाणी येत नसल्याचे प्रकरण उपमहापौरांच्या दालनात चांगलेच तापले. मिसारवाडीच्या नागरिकांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून औरंगाबाद सिटी युटिलिटीला पहिला धक्का दिला.
दरम्यान "समांतर'च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत "तुम्ही फुकट काम करत नाही, मनपा आणि सरकारने पैसे दिले आहेत. त्यामुळे लोकांना पाणी मिळालेच पाहिजे. कसे ते तुम्ही बघा. पण यापुढे सणासुदीला पाण्याची ओरड झाली तर सहन करणार नाही,' अशा शब्दांत आज पदाधिकारी, नगरसेवकांनी सुनावले. शहराची पाणीपुरवठा योजना एक सप्टेंबरपासून सिटी वॉटर युटिलिटीकडे हस्तांतरित केली."समांतर'चे काम या कंपनीकडे देण्यात आले आहे. ७९२ कोटींची ही योजना राबवताना काय अडचणी येऊ शकतात याचा अनुभव कंपनीला आला.
मनपातझापाझापी
शुक्रवारीसकाळचे सत्र आंदोलनाचे होते तर दुपारचे सत्र मनपात बैठक झापाझापीचे होते. सिडको-हडकोत ऐन महालक्ष्मीच्या सणाला पाणी आल्याने नागरिकांतील संताप, "समांतर'ने बंद केलेले टँकर, पाण्याची गळती, सिडको-हडकोच्या हक्काच्या पाण्याची पळवापळवी अशा विषयांवर उपमहापौर संजय जोशी यांनी "समांतर'चे व्यवसाय प्रमुख गौरीशंकर बसू, सहायक उपाध्यक्ष व्ही. बी. शिवांगी, मनपाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे इतर अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. उपमहापौर जोशी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महेश माळवतकर, पंकज भारसाखळे, बालाजी मुंडे, साधना सुरडकर, बबन नरवडे, नगरसेविका ऊर्मिला चित्ते यांचे पती नितीन चित्ते यांनी "सणासुदीला पाणी आल्याने नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. आता खूप झाले. यापुढे आम्ही हे सहन करणाार नाही' असे सांगत सिडको-हडकोत पाणी कमी येत असल्याची नेहमीची तक्रार केली. याशिवाय उल्कानगरी वाॅर्डातील काही नागरिकांनी गेल्या तीन वर्षांपासून नळाला पाणी येत नसल्याची तक्रार केली.
सणासुदीलाघोळ नको : चर्चेदरम्यानउपमहापौरांनी बसू शिवांगी यांना थेट शब्दांत सुनावले. आधी पाण्याची गळती बंद करा, तरच पुरेसे पाणी मिळेल. पाण्याच्या वेळा बदलण्याची कारणे शोधून त्यावर दोन दिवसांत तोडगा काढा. सिडकोसाठी येणाऱ्या पाण्यातूनच शिवाजीनगरचा टप्पा वाढवल्याने सिडको-हडकोतील पाण्याचे नियोजन साफ कोलमडले असून चार दिवसांत तो मार्गी लावा आदी सूचना त्यांनी केल्या. सणासुदीला पाण्याचे घोळ करू नका असा दमही त्यांनी भरला. यावर बसू शिवांगी यांनी सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.