आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा करणार घरगुती उपचार; सांबरांच्या जखमांवर साउंड थेरपीची मलमपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सांबरांना त्वचारोग झाल्याने कावळे चोचा मारून त्यांना रक्तबंबाळ करीत आहेत. मात्र सांबरांवर उपचार करण्यासाठी उद्यान प्रशासनाला अजून थेरपीच सुचली नाही. उपचारांएवजी साउंड, शॉटगन थेरपीचा प्रयोग करून कावळ्यांना हुसकावून लावण्यावरच मंथन सुरू आहे. दरम्यान, दिल्ली येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते नेट थेरपीच सांबरांसाठी योग्य असून दिल्लीत तसा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सिद्धार्थ उद्यानातील दोन एकर परिसरातील बंदिस्त जागेत ४२ सांबर आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेने शेड, एका बाजूला चिखलाची दलदल, पाणथळाची व्यवस्था केली आहे. या परिसरात दाट झाडी असून मांसाहारी वन्यजीवांसाठी आणल्या जाणाऱ्या मांसावर कावळ्यांचा डोळा असतो. त्यामुळे या परिसरात कावळ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. हे का&९६ल्ल्न;वळे वन्य जिवांना टाकलेल्या मांसाबरोबरच सांबरांचेही लचके तोडत आहेत. सांबर हा प्राणी मुळात मंद व भित्रा असल्याने कावळे पाठीवर बसले तरीही ते त्यांना उडवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. त्यामुळे कावळे सांबरांच्या अंगावरच चोच मारून त्यांच्या मांसाचे लचके तोडून उडून जातात.
मागील आठ दिवसांपासून सांबरांवरील जखमांची मलमपट्टी करण्यासाठी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.बी.एस.नाईकवाडे यांना वेळ मिळाला नाही. "दिव्य मराठी'ने सांबरांच्या जखमांचे छायाचित्रच प्रकाशित केल्यानंतर अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यांच्यावरउपचार करण्याऐवजी कावळे हुसकावून लावण्यावर मंथन सुरू झाले. प्रयोग म्हणून शॉटगन, साउंड थेरपीच्या उपचारांवर विचार सुरू आहे.
साउंड थेरपी
या भागात सेन्सर असलेले यंत्र बसवले जाईल. त्या सेन्सरच्या कक्षेतून एखादा कावळा आवाज करीत गेला तर ते यंत्र काही काळ सायरन वाजवेल; जेणेकरुन अन्य कावळ्यांचा थवा उडून जाईल. तर शॉटगन थेरपीत झाडांवरील कावळ्यांना उडवून लावण्यासाठी काही ठरावीक वेळानंतर आवाज केला जाईल. त्या आवाजाने कावळे त्या परिसरात फिरकणार नाहीत, अशा प्रयोगांवर काम सुरू आहे.

दिल्लीची नेट थेरपी
देशभरातील उद्यानांत सांबरांवर अशाच प्रकारे कावळे हल्ला करीत असल्याने यावर उपाय शोधत त्यांच्या जखमांवरील मलमपट्टीवर संशोधन केले गेले. यातून नेट थेरपीचा जन्म झाला. सांबराच्या परिसरालाच लोखंडाच्या बारीक गेजच्या जाळीचे कुंपण आणि वरून त्याच जाळीचे छत अंथरले जाते; जेणेकरून कावळे आत येऊच शकत नाहीत. चुकून एखादा कावळा आत घुसून त्याने जखम केली तरीही त्या सांबरावर पिचकारीच्या मदतीने मलमपट्टी करता येते. हा प्रयोग दिल्लीसह काही राज्यांत यशस्वी झाला आहे.