आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिका-वनविभागात खासबाग जागेवरून जुंपली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शहरातील खासबागेतील जागेवरून नगर पालिका वनविभागात पुन्हा जुंपली. पालिकेने ही जागा जमियत उलेमा हिंद संघटनेला लीजवर दिली आहे; परंतु ही जागा ताब्यात घेण्यासाठी संघटनेला वन विभागाने चांगलाच विरोध केला. पालिका वन विभागात झालेल्या वादामुळे बीड शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.सायंकाळी बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

बीड शहरातील खासबाग परिसरातील वनविभागाच्या प्रवेशद्वाराजवळ नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी चार गाळे बांधले होते. पालिकेने हे गाळे जमियत उलेमा हिंद या संघटनेला लीजवर देण्यासंदर्भात डिसेंबर २०१४ मध्ये ठराव घेतला होता. फेब्रुवारी २०१५ मध्ये जागेचा ताबा संघटनेला देण्यासाठी पीटीआर देण्यात आला. मौलाना झाकेर सिद्दिकी यांच्या नावाने पीटीआर देण्यात आला. या गाळ्यांचे प्रवेशद्वार मात्र वनविभागाच्या जागेतून असल्याने बुधवारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नवीन प्रवेशद्वार बसवण्यासाठी या गाळ्यांची तोडफोड सुरू केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखत जागा आमची असल्याचा दावा केला. सुरुवातीला कार्यकर्ते आणि वनविभाग अधिकाऱ्यांमध्ये जागेचा ताब्यावरून शाब्दिक चकमक झाली. यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. शहर ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांनी कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेसंदर्भातील सर्व कागदपत्रे आणि नकाशे घेऊन थेट पालिका गाठली. नगररचनाकारांची भेट घेत सर्व पुरावे देत जागा आमचीच असल्याचे सांगितले. मात्र, पालिका प्रशासनाने मुख्याधिकारी इतर वरिष्ठ अधिकारी नसल्याचे कारण देत त्यांच्याकडील जागेचे पुरावे दाखवण्यास नकार दिला.

यामुळे नेमकी जागा कुणाची हा प्रश्न कायम असल्याने आता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. शेवटी बीड येथील वनपाल एस.पी.कदम यांना कोणीतरी शिवीगाळ केल्याने ते बीड शहर पोलिस ठाण्यात सायंकाळी तक्रार देण्यासाठी गेले होते.

चेंडू कलेक्टरकडे
दरम्यान,बुधवारी लीजधारक आणि वनविभागात खडाजंगी झाल्यानंतर या जागेप्रकरणी जिल्हाधिकारीच काय तो निर्णय घेतील असे म्हणत जागेच्या वादाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात ढकलण्यात आला. पालिका आणि वनविभाग दोन्हीही आपापल्या दाव्यांवर ठाम असल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनाच लक्ष घालावे लागणार आहे.

तर मुख्याधिकाऱ्यांवरही गुन्हा...
वनविभागाच्याजागेच्या मालकीसंदर्भात सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून नगररचनाकारांना आम्ही ते दाखवले आहेत. मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असून कारवाईचेही अधिकार आम्हाला आहेत.नगरपालिका प्रशासनानेच अतिक्रमण केले असून वेळ पडल्यास आम्ही थेट मुख्याधिकाऱ्यांवरही अतिक्रमण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवू असे वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

जागा आमचीच
सदरीलजागा वनविभागाचीच आहे. अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. आता जिल्हाधिकारीच या जागेबाबत निर्णय घेतील. नगर पालिकेनेच अितक्रमण केले आहे.'' एस.पी. काळे, वनपरिक्षेत्रअधिकारी

होईल तो निर्णय मान्य
जागाआम्ही रीतसर घेतली आहे. आमच्याकडे पीटीआरही आहे. मात्र वनविभाग जागा ताब्यात घेण्याला विरोध करत आहे. हे चुकीचे आहे. आता जिल्हाधिकारी देतील तो निर्णय मान्य असेल.'' मौलानाझाकीर सिद्दिकी, लीजधारक

अतिक्रमण काढा
पालिकेनेवनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वनविभागाच्या औरंगाबाद येथील मुख्य वनसंरक्षकांनी हे अतिक्रमण पाडण्याचे स्पष्ट आदेश फेब्रुवारी २०१५ मध्येच बीड येथील अधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिक्रमण पाडण्यासाठी मात्र अद्याप वनविभाग धजावला नसून केवळ पालिका प्रशासनाला पत्र पाठवून अतिक्रमण काढण्याचे सूचित करण्यात आले आहे.
जागेचा ताबा घेण्यास वनविभागाने विरोध केल्यानंतर परिसरात गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.