आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांची उपमहापौरांनाच दमबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फटाका बाजारातील आगीसंदर्भात महापौर त्र्यंबक तुपे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी उपमहापौर प्रमोद राठोड यांनाच दमबाजी केली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. कोण कोणत्या कोपऱ्यात जातात आणि काय करतात याचीही माहिती नसते, असे राठोड म्हणाले. त्यावर बकोरिया यांनी लगेच असे काहीही म्हणू नका. तसे काहीच नाहीये. गप्प राहा. जास्त बोलू नका, असा सज्जड दमच भरला. राठोड यांनीही आपण दादागिरी करता का? जास्त बोलू नका म्हणजे काय? असे खडसावल्याने दोघांमध्ये शब्दयुद्ध पेटण्याची चिन्हे दिसत होती. महापौर त्र्यंबक तुपे यांनी चलाखी करत झनझनच घडलेल्या प्रकाराला दोषी आहेत, असा मुद्दा पुढे केला. त्यामुळे वादावर पडदा पडला.

बैठकीत राठोड यांनी प्रशासनावर थेट हल्ला चढवला. फटाका बाजारात आज भयंकर नुकसान नेमके कुणामुळे झाले याचा शोध घ्यावाच लागेल. लोकांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर आम्हालाच जाब विचारला. चुका अधिकारी करतात आणि खापर नगरसेवकांवर फुटते. हा प्रकार किती दिवस चालणार आहे? त्यामुळे अायुक्त भडकले त्यांनी राठोड यांनाच गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. दिलीप थोरात यांनीही आयुक्तांना आपण असे म्हणता कसे? आपण चुकताय, असे सांिगतले. वाद वाढत असल्याचे पाहून महापौरांनी अग्निशमन विभागप्रमुख शिवाजी झनझन यांच्याकडे मोर्चा वळवला. त्यांच्या नियोजनाअभावी हा प्रकार घडला आहे. आपण प्रत्येक उत्सव, सण आणि जयंतीपूर्वी नियोजनाची बैठक घेणे आवश्यक अाहे. यापूर्वी बैठका घेण्यात येत होत्या. आता मात्र तसे होत नसल्याचे तुपे म्हणाले. त्यामुळे वादाला कलाटणी मिळाली. पुढील दोन दिवसांत शहरातील सर्व फटाका बाजारांची काळजी घ्या, असे म्हणत महापौरांनी बैठक संपवली.
बैठकीत बोलताना आयुक्त ओमप्रकाश बकोरिया. सोबत महापौर तुपे.
बातम्या आणखी आहेत...