आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissioner For The Resolution Of MIM Support

सेना-एमआयएमची गट्टी, खा. चंद्रकांत खैरेंच्या एकछत्री कारभारालाही धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपाआयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावरून भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाल्याचे स्पष्ट होताच पालकमंत्री रामदास कदम आणखी सक्रिय झाले.
सहा महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीत एमआयएम म्हणजे धर्मांधांचा पक्ष अशी केलेली जहरी टीका बाजूला ठेवत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांना गळ घातली. शिवसेना म्हणजे जातीयवादी पक्ष असे सांगणाऱ्या इम्तियाज यांनीही पालकमंत्र्यांच्या विनंतीला मान देत प्रस्तावाच्या बाजूने ‘कदम’ टाकले. सोमवारी (१९ ऑक्टोबर) रात्री दोन तासांत घडलेल्या या घडामोडींमुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आणि मंगळवारी त्यांना प्रस्ताव मंजुरीसाठी मतदान करावे लागले. यात पालकमंत्र्यांनी एकाच दगडात खैरेंच्या एकछत्री कारभारालाही धक्का देत भाजपला राजकारणाचा नवा धडा शिकवल्याचे समोर आले आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाजन हटाव मोहिमेला हिरवा कंदील दिल्यावरही सोमवारी दुपारपर्यंत सेनेची स्थिती दोलायमान होती. खैरेंचे ऐकायचे की कदमांचे, अशा मन:स्थितीत नगरसेवक होते. दुसरीकडे भाजपमध्ये महसूलमंत्री एकनाथ खडसे विरुद्ध प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गट अशी सुंदोपसुंदी सुरू होती. एमआयएमने प्रस्तावाच्या विरोधात जाण्याचे ठरवले होते. त्यामुळे प्रस्ताव मंजुरीसाठी ७१ नगरसेवकांचा आकडा गाठणे कठीण असेच चित्र होते. काल सायंकाळी साडेसहा वाजता कदम यांनी औरंगाबादेत येताच वेगवान हालचाली केल्या. भाजपकडून शेवटच्या क्षणी निर्णय बदलू शकतो, अशी शक्यता कदमांनी गृहीत धरली होती.

शहराच्याविकासासाठी : त्यानुसारत्यांनी आमदार इम्तियाज यांना चर्चेसाठी बोलावले. शहराचा विकास खुंटला आहे, स्मार्ट सिटीचे आव्हान आहे अशा स्थितीत आयुक्त उर्वरितपान.४
अविश्वास ठराव म्हटले की पूर्वी नगरसेवक नामंजूर झालेले प्रस्ताव, फायली दाखवायचे. पण आता महाजन यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी नगरसेवकांनी वृत्तवाहिनीवरील बातमी आणि नगरसेवकांनी काढलेली व्हिडिओ क्लिप सभागृहात दाखवली.

नेत्यांमधील संघर्ष संपला
दरम्यान,महाजन यांनी मुंबईत खडसेंची भेट घेतली. खडसेंनी स्थानिक नेत्यांना प्रस्ताव आणू नका, असा निरोप दिला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे समर्थक गटही सक्रिय झाला. दानवेंचे स्वारस्य लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंच्या गटाने महाजनांच्या बाजूने उडी घेण्याचे ठरवले. मात्र, कदमांच्या चालीने भाजपच्या बड्या नेत्यांतील हा संघर्ष एकदम संपुष्टात आला, असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

फटाकेही फोडले
दलितवस्ती सुधारणेसाठी आलेला २७ कोटींचा निधी महाजनांमुळे परत गेल्याचा आरोप काही नगरसेवकांनी काल केला. प्रस्ताव मंजूर झाल्यावर मुख्यालयासमोर महेंद्र सोनवणे, जयेश अभंग, लक्ष्मण भूतकर आदींनी फटाक्यांची आतषबाजी केली.

आधी ठराव घ्या
मंगळवारीसभा सुरू होण्यापूर्वी मनपा अधिकारी संघटनेने बहिष्काराचे हत्यार उपसले होते. त्यात आयुक्तांसोबत शहर अभियंता सखाराम पानझडे यांचीही पाठराखण होती. अधिकारीच सभागृहात नसल्याने कामकाजात गोंधळ होईल प्रस्ताव रखडेल, असा अधिकाऱ्यांचा कयास होता. पण पदाधिकाऱ्यांनी बहिष्काराकडे लक्षच दिले नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा आता जबाबदारी पालकमंत्री कदमांचीच...