आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्त हटवण्यास मातोश्रीचा हिरवा कंदील, कदमांचा खा. खैरेंना धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांना हटवण्याच्या मोहिमेला गुरुवारी (१५ ऑक्टोबर) "मातोश्री'वरून हिरवा कंदील दाखवण्यात आला. पालकमंत्री रामदास कदम यांनी या मोहिमेसाठी पूर्ण ताकद पणाला लावून महाजन समर्थक खासदार चंद्रकांत खैरे यांना मोठा धक्का दिला आहे.
महाजनांवरील अविश्वास प्रस्तावावरून गेल्या महिनाभरापासून खैरे सेना नगरसेवकांत जोरदार वाद सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगरसेवकांना कदमांचे पाठबळ आहे. त्यामुळेच माजी आमदार प्रदीप जैस्वाल, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वात त्यांना मानणारे १९ नगरसेवक बुधवारी रात्री मुंबईत दाखल झाले. तेव्हा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मुश्किल असल्याचे सांगण्यात आले होते.
सकाळी आणि दुपारी चार वाजता ठाकरे यांनी दिलेली वेळ टळली. मग कदम यांनीच पुढाकार घेतला आणि सायंकाळी सहा वाजता भेट झाली. जनतेच्या हितासाठी अविश्वास प्रस्ताव आणला जात आहे, असे ठाकरे यांना सांगण्यात आल्यावर त्यांनी हिरवा कंदील दिल्याचे जंजाळ यांनी सांगितले. ठाकरे यांनी जनतेच्या कामांसाठी पदाधिकाऱ्यांनी कसे आग्रहाने अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यायला हवे हे सांगितले. पक्षसंघटन इतर बाबींवरही ठाकरे, कदम यांनी सूचना केल्या.

वैद्य,जैन, घोडेले शहरातच : दुसरीकडेया राजकीय खेळीचा अनुभव असलेले ज्येष्ठ नगरसेवक तसेच आजारी असल्यामुळे महापौर त्र्यंबक तुपे मुंबईकडे गेले नाहीत. गटनेते राजू वैद्य नवरात्रात घराबाहेर पडत नाही, असे सांगून शहरात थांबले. विकास जैन यांनीही जाणे टाळले. खैरेंवर टीका करणाऱ्यांच्या सावलीपासून दूर राहणारे नंदकुमार घोडेले तर जाण्याचा प्रश्नच नव्हता.

खैरेंनापुन्हा धक्का : कदमपालकमंत्री झाल्यापासून त्यांचा खैरेंशी कायम वाद सुरू आहे. मनपा हेच खैरेेंच्या सत्तेचे केंद्र असल्याने कदमांनी त्याकडे लक्ष वळवल्याने खैरे गेल्या तीन महिन्यांपासून चांगलेच अस्वस्थ आहेत. महाजन अविश्वास प्रस्तावावरून आपली ताकद दाखवून देण्याची तयारी खैरे यांनी केली होती. निवृत्तीस केवळ तीन महिने बाकी असल्याने महाजन यांना येथेच सन्मानाने

कदमांची प्रतिष्ठा पणाला
-आताभाजपला कच खाऊन माघार घेतली, तर पुन्हा भाजपची नाचक्की होईल. पालकमंत्र्यांची प्रतिष्ठाही पणाला लागणार आहे.
-ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व सेना नगरसेवकांची बैठक घ्यावी लागेल.
-शहर अभियंता पानझडे यांच्या निलंबनाच्या प्रस्तावामुळे अधिक अस्वस्थ झालेल्या खैरे यांना पानझडेंचे संरक्षण करता येणार नाही.